मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिला न्यायदेवता म्हटले आहे. पुण्य आणि पापाच्या आधारे ते प्रत्येकाला फळ देतात. हा क्रोधी ग्रह मानला जातो. यामुळे शनिदेवाची (Shanidev) वक्र दृष्टी ज्याच्यावर पडते त्याचे वाईट दिवस सुरू होतात. आज आम्ही तुम्हाला शनिदेवाची दृष्टी अशुभ का मानली जाते ते सांगत आहोत. शनिदेवाची तुमच्यावर वक्र दृष्टी आहे हे कसे ओळखावे आणि त्याचा प्रभाव कसा टाळावा हेही जाणून घेणार आहोत.
सूर्यपुत्र शनीचा विवाह चित्ररथ नावाच्या गंधर्वाच्या कन्येशी झाला, जी स्वभावाने अत्यंत तापट होती. एकदा शनिदेव देवाची आराधना करत असताना त्यांची पत्नी ऋतुस्नानानंतर भेटण्याच्या इच्छेने त्यांच्याकडे पोहोचली. पत्नीने आपल्या सौंदर्याने त्यांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला पण ध्यानस्थ बसलेल्या शनिदेवांनी डोळे उघडले नाही. त्यानंतर त्यांच्या पत्नीने संतापून शनिदेवाला शाप दिला की शनिदेव जेव्हा कोणाला पाहतील तेव्हा त्या व्यक्तीचे नुकसान होईल. शनिदेवाच्या पत्नीने शाप देताना सांगीलले की शनिदेवाचे कोणालातरी दर्शन होणे आणि शनिदेवाला दुसर्याने भेटल्याने त्या व्यक्तीचे नुकसान होईल. त्याच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळेल. त्या व्यक्तीला शनिदेवाचा तीव्र प्रकोप सहन करावा लागेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)