Shani: कुंभातील शनी अस्तामुळे ‘या’ राशीच्या लोकांमध्ये येणार भूकंप, पुढचे 32 दिवस राहणार धोक्याचे

| Updated on: Feb 01, 2023 | 3:33 PM

एखादा ग्रह अस्त (Shani Asta) होतो तेव्हा तो अशुभ मानला जातो. अशा स्थितीत काही राशींसाठी शनीचा अस्त अत्यंत घातक ठरणार आहे.

Shani: कुंभातील शनी अस्तामुळे या राशीच्या लोकांमध्ये येणार भूकंप, पुढचे 32 दिवस राहणार धोक्याचे
शनि
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, शनिदेवाला न्याय देवता आणि कर्माचा दाता म्हटले जाते. शनि त्याच्या दशा, महादशा, साडेसाती किंवा अडिचकीच्या काळात मनुष्याला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनीने 30 वर्षांनंतर 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. तो आता 31 जानेवारीला कुंभ राशीत आला आहे. याच स्थितीत तो 5 मार्चपर्यंत येथेच राहणार आहे. ज्योतिषशास्त्रात जेव्हा जेव्हा एखादा ग्रह अस्त (Shani Asta) होतो तेव्हा तो अशुभ मानला जातो. अशा स्थितीत काही राशींसाठी शनीचा अस्त अत्यंत घातक ठरणार आहे.

या राशींच्या जातकांना ठरणार धोकादायक!

मेष-

शनिदेव मेष राशीच्या अकराव्या घरात स्थित आहेत. याचा परिणाम या राशीच्या लोकांच्या करिअर आणि शिक्षणावर होईल. या राशीच्या लोकांना या क्षेत्रात खूप अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्ही कुठेही पैसे गुंतवणार असाल तर सावध राहा आणि शनीच्या उदयाची वाट पहा.

वृषभ-

शनीच्या अस्तामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक समस्या निर्माण होतील. पालकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्ही जे काही काम कठोर परिश्रमाने कराल, त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

मिथुन-

शनिदेवाला मिथुन राशीचा स्वामी मानले जाते. या राशीच्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत तो नवव्या घरात आहे. या काळात नशीब साथ देणार नाही. दुर्दैवाचा सामना करावा लागेल. वाईट बातमी मिळू शकते. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)