मुंबई, दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्या शनि जयंती (Shani Jayanti 2023) म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेव आणि देवी छाया यांचा पुत्र शनिचा जन्म झाला असे मानले जाते. यावर्षी शनि जयंती 19 मे 2023 रोजी येत आहे. शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. शनिदेव व्यक्तीच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार फळ देतात. शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची आराधना आणि मंत्र पठण केल्याने शुभ फळ मिळते. एवढेच नाही तर शनिदशामुळेही त्या व्यक्तीला आराम मिळतो. शनि जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळू शकते आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घेऊया शनि जयंतीची तारीख आणि त्या दिवशी करावयाचे उपाय.
ज्येष्ठ महिन्याची अमावस्या गुरुवार, 18 मे 2023 रोजी सकाळी 09:42 पासून सुरू होईल आणि शुक्रवार, 19 मे 2023 रोजी रात्री 09:22 वाजता समाप्त होईल. 19 मे 2023 रोजी उदया तिथी आहे, त्यामुळे या दिवशी शनि जयंती साजरी केली जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)