मुंबई : सध्या हिंदी भाषिकांचा श्रावण (Shrawan 2023) महिना सुरू आहे. या महिन्यातील पहिला प्रदोष व्रत कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जाईल. या प्रदोष (Shani Pradosh Vrat) व्रताचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी सर्व भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. या काळात केलेल्या उपासनेने भक्तांच्या मनोकामना जलद पुर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व समस्या ही दूर होतात. हिंदी भाषिकांच्या श्रावणातला पहिला प्रदोष व्रत शनिवार, 15 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. शनिवारी असल्यामुळे या प्रदोषाला शनि प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी सिद्धी योगही तयार होत आहे.
त्रयोदशी तिथीची सुरुवात 14 जुलै रोजी रात्री 11.00 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. प्रदोष काळात संध्याकाळी शंकराची पूजा केली जाते. या कारणास्तव 15 जुलै रोजी शनि प्रदोष व्रत पाळण्यात येणार आहे. दिवसभर उपवास करून, प्रदोष काळात भगवान शंकराची आराधना केल्यानंतर, एकवेळ फळे खाऊ शकतात.
प्रदोष व्रत ठेवून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यास पुत्रप्राप्ती होते. तर दुसरीकडे श्रावण महिन्यात प्रदोष व्रत ठेवून भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व बाधा दूर होतात. या दिवशी संध्याकाळचे व्रत ठेवून पुत्रप्राप्तीची इच्छा ठेवून संध्याकाळच्या वेळी भगवान शंकराला जलाभिषेक करावा. तसेच बेलपत्र अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल.
शनिवारी प्रदोष व्रत ठेवा. सकाळी स्नान करून उपवास सुरू करा. दुसरीकडे, संध्याकाळी 5:30 ते 7:30 पर्यंत प्रदोष कालात भगवान शिवाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. सूर्यास्तानंतर 45 मिनिटांनी प्रदोष काल सुरू होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)