मुंबई : पंचांगानुसार प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्यात दोनदा येते. प्रदोष व्रत (Shani Pradosh Vrat) हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. प्रदोष व्रत कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही तिथींनाच पाळले जाते. यावेळी प्रदोष व्रत 01 जुलै म्हणजेच आज पाळण्यात येत आहे. हे प्रदोष व्रत शनिवारी पाळले जात असल्याने आजचा दिवस शनि प्रदोष व्रत म्हणून ओळखला जाईल. तसेच या दिवशी शंकरासोबत शनिदेवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. हे प्रदोष व्रत शनिवारी पाळले जात असल्याने हे प्रदोष व्रत विशेष मानले जाते.
पुराणानुसार हे व्रत केल्यास दीर्घायुष्याचे वरदान मिळते. प्रदोष व्रत हे भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी विशेष मानले जात असले तरी शनि प्रदोष व्रत पाळणाऱ्यांना भगवान शंकराची तसेच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. म्हणूनच या दिवशी भगवान शिवासोबत शनिदेवाचीही पूजा करावी. असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांचे सर्व त्रास दूर होतात आणि त्यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 01 जुलै रोजी म्हणजेच आज सकाळी 01:16 वाजता सुरू होत आहे. ती आज 01 जुलै रोजी रात्री 11.07 वाजता संपेल. उदयतिथीनुसार शनि प्रदोष व्रत 01 जुलैला म्हणजेच आजच आहे. प्रदोषकाळात 04 मार्च रोजी सायंकाळी 7.21 ते रात्री 9.24 या वेळेत भगवान शिवाची पूजा करता येईल. यासोबतच आज रवि योगही तयार होणार आहे.
प्रदोषकाळात शिवमंदिरांमध्ये संध्याकाळी शिवमंत्राचा जप करावा. शनि प्रदोषाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. गंगा जलने पूजास्थान स्वच्छ करावे. बेलपत्र, अक्षत, दीप, धूप, गंगाजल इत्यादींनी भगवान शिवाची पूजा करा. यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि शिवाला जल अर्पण करा. शनीची पूजा करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवाच्या मंदिरात दिवा लावावा. त्रयोदशीलाच व्रत सुरू करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)