शनी प्रदोषावेळी काय करावे? जाणून घ्या तिथी आणि व्रताचे महत्त्व

| Updated on: Dec 21, 2024 | 4:06 PM

शनी प्रदोष व्रत 28 डिसेंबरला आहे. हा वर्षातील शेवटचा दोष आहे. या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता तसेच संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते. शनी प्रदोषाच्या दिवशी शनिदेवाच्या प्रिय वस्तूंचे दान केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊया शनी प्रदोषाची तिथी किती आहे आणि या पूजेचा शुभ मुहूर्त कधी आणि शनी प्रदोष व्रताची पूजा पद्धत.

शनी प्रदोषावेळी काय करावे? जाणून घ्या तिथी आणि व्रताचे महत्त्व
Shani Pradosh Vrat 2024
Follow us on

वर्ष २०२४ मधील शेवटचे प्रदोष व्रत यंदा शनिवारी असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हटले जात आहे. शनी प्रदोष व्रत यावर्षी 28 डिसेंबरला आहे. असे मानले जाते की शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याबरोबरच शनी देवाच्या संबंधित काही उपाय केल्याने शिव भगवानसह शनीदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि तुमची सुख-समृद्धी वाढते. तसेच प्रदोषाचे व्रत भगवान शिव आणि गौरी माता यांना समर्पित आहे, जे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला ठेवले जाते आणि असे केल्याने तुमच्या घरात सुख-शांती प्रस्थापित होते. तुम्ही सुद्धा येणाऱ्या शनी प्रदोष व्रताची पूजा व उपाय केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. चला तर मग जाणून घेऊयात शनी प्रदोष व्रताचे महत्त्व….

शनी प्रदोष व्रत कधी आहे?

या वर्षातील शेवटचे प्रदोष व्रत 28 डिसेंबर 2024 रोजी आहे. हे व्रत शनिवारी येत असल्याने याला शनी प्रदोष व्रत म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला हे व्रत केले जाते. ही तारीख 28 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 2 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल आणि 29 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 3 वाजून 32 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार हे व्रत 28 डिसेंबर रोजी केले जाणार आहे. या दिवशी सायंकाळी ५.२१ ते ८.०६ या वेळेत प्रदोष कालाची पूजा केली जाणार आहे. तसेच यावेळेस भगवान शंकर आणि शनिदेवाची पूजा करावी.

शनी प्रदोष व्रताचे महत्त्व

शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर यांच्यासह शनिदेवाची पूजा करावी. असे मानले जाते की यामुळे शनीच्या वाईट प्रभावांपासून संरक्षण होते. हे व्रत केल्याने भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा यंदाच्या शेवटच्या प्रदोष व्रताचा लाभ घ्या आणि भगवान शिव आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळवा. असे केल्याने नवीन वर्षातही तुम्हाला शिव आणि शनीचा आशीर्वाद मिळेल. शनी प्रदोष व्रत हा एक खास प्रसंग आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने विशेष फळ मिळते. त्या सोबत दान देखील करू शकता.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)