हिंदू धर्मात दर महिन्याला कोणते ना कोणते उपवास केले जात असतात आणि त्या उपवासाचे स्वतःचे एक महत्त्व असते. यामध्ये शनी प्रदोष व्रताचा देखील समावेश आहे. कारण हिंदू धर्मात हे व्रत खूप खास मानले जाते. हे व्रत दर महिन्याच्या त्रयोदशी तिथीला आणि महिन्यातून दोनदा येते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये हा दिवस भगवान शंकराला समर्पित करण्यात आला आहे. हिंदू धर्माच्यामान्यतेनुसार जो कोणी व्यक्ती शनी प्रदोष व्रत करतो, भगवान शिव त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. शनी प्रदोष व्रत शनिवारी येते तेव्हा त्याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. यावर्षीही वर्षाचे पहिले प्रदोष व्रत शनिवारी होत आहे. त्यामुळे त्याला शनी प्रदोष व्रत म्हटले जाईल. त्यामुळे या दिवशी पूजा केल्यास भगवान शिव तसेच शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी शनि प्रदोष व्रताची तिथी 11 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 21 मिनिटांनी सुरू होईल. तर 12 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी संपणार आहे. अशा तऱ्हेने उदय तिथीनुसार शनी प्रदोषाचे व्रत ११ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल. पूजेचा हा शुभ मुहूर्त रात्री ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत राहील.
शनि प्रदोष व्रताचे महत्त्व आणि महिमा शिवपुराणात सांगितले आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व क्लेश दूर होतात. त्याचबरोबर आरोग्यही प्राप्त होते. हिंदू मान्यतेनुसार शनिप्रदोषाचे व्रत आणि पूजा केल्याने १०० गायींचे दान करण्यासारखे पुण्य मिळते. अपत्य प्राप्तीसाठी शनी प्रदोष व्रतही केले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)