Shani Pradosh : आज शनि प्रदोष व्रत, या उपायांनी दूर होईल प्रगतीमधील बाधा, लाभेल सुख समृद्धी

| Updated on: Jul 01, 2023 | 10:19 AM

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत म्हणतात. शनिवारी त्रयोदशी तिथी असल्यामुळे याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. शनि प्रदोष व्रतात भगवान शंकराची पूजा करणे खूप शुभ मानल्या जाते.

Shani Pradosh : आज शनि प्रदोष व्रत, या उपायांनी दूर होईल प्रगतीमधील बाधा, लाभेल सुख समृद्धी
प्रदोष व्रत
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. आज म्हणजेच 1 जुलैला, शनिवार आषाढ महिन्यातील प्रदोष व्रत आहे. शनि प्रदोष व्रत (Shani Pradosh Vrat) अतिशय विशेष मानले जाते. हे व्रत केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि शनिदोषही दूर होतो. शनि प्रदोष व्रत देखील पुत्रप्राप्तीच्या इच्छेसाठी पाळले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोष कालात भगवान शिवाची माता पार्वतीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो. असे मानले जाते की शनि प्रदोषाच्या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकराची पूजा केल्यास संतती प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा परिस्थितीत शनि प्रदोष व्रताची पूजा पद्धत आणि उपाय जाणून घेऊया.

शनि प्रदोषाच्या दिवशी आपली छाया दान करा

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी छाया दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच शनि प्रदोष व्रताच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून त्यात आपली सावली पाहून हे तेल शनि मंदिरात दान करावे. तेल दान करताना त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे.

शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करा

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण करा. असे म्हटले जाते की शनिवारी हे करणे खूप शभ आणि फलदायी आहे. आपण इच्छित असल्यास,  उडीद डाळ, काळे बूट, काळे कपडे आणि शनिशी संबंधित वस्तू दान करू शकता. असे म्हणतात की असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची विशेष कृपा राहते.

हे सुद्धा वाचा

शनि प्रदोष व्रतात केलेल्या या उपायाने लाभते भाग्य

जर एखाद्याला व्यवसायात वारंवार निराशा येत असेल तर शनि प्रदोष व्रताच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खायला द्या. या उपायाने तुमचे निद्रस्थ भाग्य जागे होईल.

गरजूंना अन्नदान करा

शनि प्रदोष व्रताच्या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला अन्न आणि पाणी दान करावे. असे केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.

घोड्याची नाल

व्यवसायात प्रगतीसाठी शनि प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर घोड्याची नाल लावा. असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)