कलियुगात हनुमानाला (Hanuman) सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जाते. यांच्या उपासनेने कुंडलीतील सर्व ग्रहदोष (Grahadosh) नष्ट होतात. विशेषतः शनीच्या साडेसाती (sadesati) आणि अडीचकीमध्ये हनुमानाचे उपाय भक्तांचे वाईट काळापासून रक्षण करतात. शनिवार हा शनिदेवाचा (shanidev) दिवस मानला जातो, त्यामुळे अनेकजण दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी उपवास करतात. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि शनिदेवाला सकारात्मक बनवण्यासाठी शनिवारी काही खास उपाय करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया शास्त्रात सांगितलेले हे उपाय, ज्यामुळे शनिदेव साडेसातीतही तुमच्यावर प्रसन्न राहतीत.
व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष असेल तर ती व्यक्ती कायम संकटात असते. ही व्यक्ती चुकीच्या मार्गाला जात अनैतिक कार्यात अडकते. यासह धनहानी देखील होते. अशा व्यक्तींच्या जीवनात कायम समस्या निर्माण होत असते. शनिदोष असलेल्या व्यक्तीनी शनिवारी काही उपाय केल्यास दोष दूर होते. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)