Shani: या चुकांमूळे शनीदेव करतात आर्थिक नुकसान, अशा प्रकारे होतो धनलाभ

| Updated on: Jan 31, 2023 | 9:02 AM

शनीच्या प्रभावाने केव्हा आणि कसे धनहानी किंवा धनलाभ होतो ते जाणून घेऊया. कुंडलीतील अशुभ घरांमध्ये शनी असेल किंवा शनि दुर्बल राशीत असेल तर..

Shani: या चुकांमूळे शनीदेव करतात आर्थिक नुकसान, अशा प्रकारे होतो धनलाभ
शनीदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, शनि हा जीवनातील सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा कारक आहे. तुम्ही श्रीमंत व्हाल की गरीब, हे फक्त शनिदेव (Shani) तुमच्या कर्माच्या आधारे ठरवतात. शनीची महादशा 19 वर्षे टिकते. म्हणूनच शनि नकारात्मक प्रभावामुळे दीर्घकाळ आर्थिक त्रास देतो. जर शनि नकारात्मक असेल तर साडेसाती किंवा अडिचकीमुळे लोकांना धनहानीचा सामना करावा लागतो. शनीच्या प्रभावाने केव्हा आणि कसे धनहानी किंवा धनलाभ होतो ते जाणून घेऊया.

कधी होते धनहानी?

कुंडलीतील अशुभ घरांमध्ये शनी असेल किंवा शनि दुर्बल राशीत असेल तर धनहानी होते. शनि सूर्यासोबत असला तरी धनहानी होते. याशिवाय कुंडलीत शनि प्रतिकूल असेल आणि शनीची साडेसाती किंवा महादशा चालू असेल तर धनहानी होते. तुम्ही कोणत्याही सल्ल्याशिवाय निळा नीलम धारण केला असला तरी शनिमुळे आर्थिक नुकसान होते.

कधी होतो धनलाभ?

कुंडलीत शनि अनुकूल असेल आणि तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या घरात असेल तर व्यक्तीला धनलाभ होतो. शनि स्वतःच्या घरात बसला असेल तर धनलाभही होतो. शनि विशेष अनुकूल असेल आणि शनीची महादशा, साडेसाती किंवा अडिचकी सूरू असल्यास आर्थिक लाभही होतो. याशिवाय जर व्यक्तीचे आचरण शुद्ध असेल आणि आहार सात्विक असेल तर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते.

हे सुद्धा वाचा

नोकरीत लाभासाठी शनिदेवाला या प्रकारे प्रसन्न करा

पहिल्या शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा गोल दिवा लावावा. यानंतर झाडाची किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा. परिक्रमेनंतर शनिदेवाच्या “ओम प्रीम प्रम सह शनैश्चराय नमः” मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा.  गरीब व्यक्तीला नाणी दान करा.

व्यवसायात लाभासाठी शनिदेवाला या प्रकारे प्रसन्न करा

शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडावर पाणी टाकावे. संध्याकाळी त्याच झाडाखाली लोखंडी भांड्यात मोठा दिवा लावावा. त्यानंतर तेथे उभे राहून शनि चालिसाचे पठण करावे. पाठानंतर, एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न द्या. या दिवशी स्वतःला शुद्ध ठेवा.

पैशाची बचत करण्यासाठी शनिदेवाला असे करा प्रसन्न

प्रत्येक महिन्याला तुमच्या संपत्तीतील काही भाग मोहरीचे तेल किंवा काळी मसूर दान करा. नाणे काळ्या कपड्यात बांधून घरात अंधारात ठेवा. शनिवारी मांसाहार करू नका आणि मद्यसेवन करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)