मुंबई, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावास्येला मौनी अमावस्या (Mauni Amavasya 2023) म्हणतात. यावेळी 21 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज मौनी अमावस्या साजरी केली जात आहे. या दिवशी मौन बाळगण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मौन पाळताना मन आणि वाणीवर संयम ठेवावा. याला शनैश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी मंत्रजप केल्याने सिद्धी प्राप्त करता येते. मौनी अमावस्येच्या दिवशी मनात कोणतेही चुकीचे विचार आणू नयेत. या दिवशी मंत्रांचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जाही संपते. मौनी अमावस्येच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि सूर्य नारायण यांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा.
अनेक वर्षांनी मौनी अमावस्या शनिवारी येत आहे. या दिवशी जप आणि तपश्चर्या केल्याने अक्षय फळ मिळते. या दिवशी शनिदेवाचीही पूजा करावी. ज्यांना साडेसाती आणि अडिचकीचा त्रास आहे त्यांनी या दिवशी दानधर्म अवश्य करावा. जेणेकरून सर्व ग्रह दोष दूर होतात. या दिवशी खीर बनवावी आणि आपल्या पूर्वजांना पत्रावळीवर अर्पण करावी.
शनिदेवाचा त्रास टाळण्यासाठी या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दुसरीकडे शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. शमीची पाने अर्पण करा. यासोबतच या दिवशी शनिदेवाला निळे फूल अर्पण करावे. घरामध्ये आर्थिक संकट असल्यास शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत. या दिवशी दान आणि सत्कर्म केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
मौनी अमावस्या 21 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज सकाळी 06:16 वाजता सुरू झाली आहे आणि 22 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच उद्या रात्री 02:22 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, मौनी अमावस्या 21 जानेवारीला म्हणजेच आजच आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)