Shaniwar Upay : शनिवारी केलेल्या या उपायांमुळे मिळेल भाग्याची साथ, अर्धवट कामं लागतील मार्गी

| Updated on: Feb 17, 2023 | 5:31 PM

या शनिवारी महाशिवरात्री असल्याने यंदाचा शनिवार महत्वाचा आहे. शनिवारी  केल्याने या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

Shaniwar Upay : शनिवारी केलेल्या या उपायांमुळे मिळेल भाग्याची साथ, अर्धवट कामं लागतील मार्गी
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची (Shaniwar Upay) विधिवत पूजा केली जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला (Shanidev) कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. या शनिवारी महाशिवरात्री असल्याने यंदाचा शनिवार महत्वाचा आहे. शनिवारी  केल्याने या उपायांमुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

शनिवारी करा हे 5 उपाय

    1. शनिवारी पिंपळाच्या 11 पानांचा हार बनवावा. आजवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी. हार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे कोर्ट-कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील.
    2. शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा. परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे. असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल.
    3. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.
    4. शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्या. तसेच ‘शं शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल.
    5. शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडी साखर घाला. हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. तसेच ‘ओम ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

 

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)