शनिदेव
Image Credit source: Social Media
मुंबई, आज, शनिवार (Shaniwar Upay) हा कर्माचा दाता शनिदेवाच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता. शनीदेवाच्या उपासनेमुळे अनेक त्रासातून मुक्ती मिळते. या उपायांमुळे तुम्हाला कोर्ट-कचेरीत यश मिळेल, व्यवसायातही प्रगती होईल. जे लोक लोखंडाशी संबंधित व्यवसायात आहेत त्यांनी शनिवारी उपाय करावे कारण लोह हा शनिदेवाचा प्रिय धातू आहे.
जाणून घेऊया शनिवारचे उपाय
- शमीची पाने शनिदेवाला प्रिय आहे. शनिवारी या रोपाला पाणी द्या आणि त्याची सेवा करा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि घरात धनाचे आगमन होईल.
- शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. त्यानंतर एक कच्चा धागा घेऊन झाडाला सात वेळा गुंडाळा. शनिदेवाचे स्मरण करा आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी त्यांची प्रार्थना करा.
- जर तुम्हाला शनिदोष, साडेसाती किंवा अडिचकीचा त्रास होत असेल तर तुम्ही शनिदेवाच्या बीज मंत्राचा ओम ऐं ह्रीं श्री शनैश्चराय नमःचा किमान 108 वेळा किंवा एक जपमाळ जप करावा. शनि मंदिरात जाऊन या मंत्राचा जप केल्यास उत्तम परिणाम मिळतील.
- शनिवारी उपवास करणे आणि शनिदेवाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. पूजेच्या वेळी शनिवार व्रत कथा वाचावी. यामुळे तुमचे ग्रह दोषही दूर होतील आणि तुमचे संकटही दूर होतील.
- वाईट संगत आणि वाईट व्यसन सोडणे हा सर्वात माेठा उपाय आहे. जुगार, दारू, चोरी, व्यभिचार यांसारख्या वाईट गोष्टी सोडून द्या. असहाय लोकांना मदत करा.
- जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही असहाय लोक, स्त्रिया, मुलं यांना दुखावत असाल किंवा ते कावळा, कुत्रा, गाय यासह इतर प्राण्यांना त्रास देतात. जर तुम्ही वडिलधाऱ्यांचा अपमान करत असाल तर लगेच या सवयी सोडा. त्या दिवसापासून तुमचा शनि सकारात्मक प्रभाव देऊ लागेल.
- कपाळावर लाल चंदनाचा तिलक लावा आणि दर शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करा. तुम्हाला शनीच्या त्रासातून आराम मिळेल आणि जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)