Shardiya Navratri 2023 : आर्थिक तंगी दूर करण्यासाठी शारदीय नवरात्रीत करा हे उपाय, होईल धनलाभ

| Updated on: Oct 13, 2023 | 2:57 PM

नवरात्रीच्या काळात, आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सुपारी आणि  विड्याच्या पानांचा काही उपाय करू शकता. देवी-देवतांच्या पूजेमध्ये विड्याचे पानं आवश्यक असतात.

Shardiya Navratri 2023 : आर्थिक तंगी दूर करण्यासाठी शारदीय नवरात्रीत करा हे उपाय, होईल धनलाभ
शारदीय नवरात्री
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीची (Shardiya Navratri 2023) सुरुवात होते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीमध्ये देवीची सेवा केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते.  दुर्गा देवीच्या आगमनाला आता दोन दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात, आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सुपारी आणि  विड्याच्या पानांचा काही उपाय करू शकता. देवी-देवतांच्या पूजेमध्ये विड्याचे पानं आवश्यक असतात. नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानांनी काही खास उपाय केले जाऊ शकतात.

विड्याच्या पानांचे उपाय

नवरात्रीच्या पहिल्या 5 दिवसात विड्याच्या पानावर चंदनाने दुर्गा देवीचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा. ओम ह्रिम क्लीम चामुंडयै विचारे हा मंत्र दुर्गा चा बीज मंत्र आहे

त्यानंतर नवमीच्या दिवशी ही विड्याची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते.

हे सुद्धा वाचा

नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोजच्या पूजेच्या वेळी विड्याच्या पानात गुलाबाच्या पाकळ्या मिसळून दुर्गा देवीला अर्पण करा. यामुळे तुमच्या पैशाची समस्या दूर होईल. नवरात्रीच्या 9 दिवसांनंतर ही सुपारीची पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करा. अशाप्रकारे माता दुर्गा आपल्या भक्तांवर आशीर्वाद देतात.

खूप मेहनत करूनही तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात तुम्ही हे उपाय करू शकता. नवरात्रीचे नऊ दिवस विड्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावून दुर्गेच्या चरणी अर्पण करावे. यानंतर उशीजवळ ठेवा आणि झोपा. त्यामुळे व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

जर तुमच्या घरात भांडणे होत असतील तर विड्याची ही युक्ती तुम्हाला मदत करू शकते. नवरात्रीमध्ये विड्याच्या पानावर कुंकू लावून ते  देवीला अर्पण करावे. या उपायाने घरातील वातावरण सकारात्मक राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)