Shardiya Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसात अवश्य करा हे उपाय, कधीच करावा लागणार नाही आर्थिक समस्यांचा सामना

| Updated on: Jul 30, 2023 | 10:42 AM

Shardiya Navratri 2023 नवरात्रीच्या दिवसात सकारात्मक उर्जेचा प्रवाह अधिक असतो. या दिवसात केलेल्या उपासनेचे फळं हे लवकर मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे.

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसात अवश्य करा हे उपाय, कधीच करावा लागणार नाही आर्थिक समस्यांचा सामना
शारदीय नवरात्री 2023
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : दरवर्षी नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांत (Shardiya Navratri 2023) दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांत काही विशेष उपाय केल्यास आर्थिक तंगीपासून सुटका होते, तसेच माता दुर्गेचा आशीर्वाद कायम राहतो. समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचाही वापर केला जातो. लवंगाचे काही उपाय घरात सुख-समृद्धी तसेच बरकत आणू शकतात. यावेळी 14 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात लवंगाचे उपाय करणे अत्यंत फलदायी मानले जाते.

नवरात्रीत करा प्रभावी उपाय

आशीर्वादासाठी : नवरात्रीच्या नऊ दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा, यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते.

नकारात्मकता दूर करण्यासाठी : नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगसोबत कापूर जाळा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते.

हे सुद्धा वाचा

सुखी वैवाहिक जीवनासाठी : तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती आणा आणि तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

लग्नातील अडथळ्यांसाठी : जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला 2 हळकंड 4 लवंगांसह घ्या आणि तुमची इच्छा सांगा. यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील.

नोकरीसाठी : एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी. नोकरीचे योग जुळून येतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)