मुंबई, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशीचे (Shatatila Ekadashi 2023) व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना आणि नियमानुसार उपवास केल्याने इच्छित फळ मिळते, असे सांगितले जाते. या दिवशी जो साधक भगवान विष्णूंना तीळ अर्पण करतो, तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. यावर्षी षटतीला एकादशीचे व्रत 18 जानेवारीला म्हणजेच उद्या पाळले जाणार आहे. या व्रताचे कोणकोणते नियम आहेत ते जाणून घेउया.
1. षटतीला एकादशीच्या दिवशी वांगी आणि तांदूळाचे सेवन करू नये.
2. या दिवशी मांस, मद्य आणि मद्यपान करू नका आणि ब्रह्मचर्य पूर्णत: पाळा.
3. उपवासाचे व्रत घेणाऱ्या साधकाने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे, विश्रांती घ्यावी.
4. षटतीला एकादशीच्या दिवशी वाईट शब्द उच्चारू नका. खोटे बोलणे टाळा.
5. षटतीला एकादशीच्या दिवशी झाडाची फुले, पाने किंवा डहाळे तोडू नका.
वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. वैदिक शास्त्रात एकादशीचे व्रत हे सर्वोत्तम आणि सर्वात मोठे व्रत मानले गेले आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, एकादशीच्या उपवासाचा थेट परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. या व्रताने चंद्राचा प्रत्येक नकारात्मक प्रभाव थांबवला जाऊ शकतो. या व्रताने ग्रहांचा प्रभावही बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)