मुंबई : श्रावण महिन्यात येणारा प्रदोष व्रत (Shawan Pradosh) विशेष महत्वाचा मानला जातो. या महिन्यात प्रदोष व्रत पाळल्यास पूजेचे दुप्पट फळ मिळते. 18 जुलैला अधिक श्रावणाला सुरूवात झाली आहे. महिन्यात येणारे पहिला प्रदोष व्रत हे 30 जुलैला रविवारी साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यात प्रदोष व्रत पाळल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. श्रावण महिन्यात केलेल्या प्रदोष व्रताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामुळे अकात मृत्यूचे भय दूर होते.
प्रदोष व्रताचा दिवस चंद्र दोष दूर करण्यासाठी देखील शुभ मानला जातो. या दिवशी भोलेनाथसोबतच चंद्राचीही पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी चंद्राची पूजा केल्याने पत्रिकेतील चंद्राची स्थिती मजबूत होते. या दिवशी चंद्राची पूजा करणे फलदायी मानली जाते. श्रावणाचे प्रदोष व्रत पाळल्यास नकारात्मक परिणाम टाळता येतात.
प्रदोष काळात या व्रताची पूजा करणे नेहमीच शुभ मानले जाते. दिवस आणि रात्रीच्या भेटीच्या वेळेला प्रदोष काल म्हणतात. या दिवशी व्रत पाळल्यास माणसाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. या दिवशी उपासना केल्याने सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. प्रदोष व्रत पाळल्याने चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे प्रदोष व्रत पाळल्याने मनाची चंचलता दूर होऊन मन शांत राहते.
प्रदोष व्रत हे हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा केल्याने चंद्रदेवासह भोलेनाथ प्रसन्न होतात आणि व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. प्रदोष व्रत पाळल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. या दिवशी शिवाची पूजा केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते आणि सर्व संकटे दूर होतात. या व्रताचे महत्त्व सर्वप्रथम भगवान शंकराने माता सतीला सांगितले होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)