देवाची आरती, देव मला पावती! वोवालूया! संकासूराबरोबर पारंपरिक नाच, शिमगोत्सवात कोकणाच्या वैभवाचे दर्शन

| Updated on: Mar 15, 2022 | 10:48 AM

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली होळी खास मानली जाते.

1 / 6
चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या आडव्या महाराष्ट्रात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी कोकणातली होळी ही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजते.

2 / 6
लाल मातीच्या गाभ्यात उभ्या केलेल्या पोफळी-आंबारूपी होळीच्या ज्वाळा अंधार भेदून गगनाला भिडू पाहतात त्यावेळी कोकणी माणसांना काबाडकष्ट करण्यासाठी वर्षभराची ताकद मिळालेली असते.

3 / 6
शिमगोत्सव हा कोकणी माणसाच्या जीवाळ्याचा सण. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव असतो. शेकडो वर्षांच्या परंपरा आणि मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवात सहभागी होतो. या उत्सवा दरम्यान सादर होणा-या लोककला.

4 / 6
कोकणातल्या शिमगोत्सवात वैशिष्ट्ये पूर्ण ठरतात ते इथले खेळेआणि याच खेळ्यातील मुख्य आकर्षण असतो तो संकासूर. देवीच्या रक्षकाणाचं मिळालेला मान म्हणून संकासुराची खेळ्यातील ओळख. काळा पायघोळ, डोक्यावरती काळी टोपी. पांढरी दाडी लावून कंबरेला घुंगुर बांधायचा असा या संकासूराचा वेश.

5 / 6
कोकणच्या ग्रामीण भागातील हे कलावंत पिढ्यान पिढ्यांकडून आलेली ही सांस्कृतीक ठेव तितक्याच आपुलकिने जपतात.शिमगोत्सवात कोकणच्या ग्रामीण भागातील हे कलावंत आप आपल्या पारंपरिक लोककला विविध ठिकाणी सादर करतात. शिमगा सुरू झाल की मृदुंगावर देवळात थाप पडते आणि गाव गावातील हे खेळे प्रत्येक घरा घरात जावून सादरीकरण करतात.

6 / 6
काठखेळ आणि संकासूर हे खेळ्याचे वैशिष्टे प्रत्येकाचे मान हे खेळ्यांमध्ये ठरलेले असतात. विशेष म्हणजे गुहागरमधील अडूर गावातील संकासूर होळीच्या निखा-यातून नाचतो हे बघण्यासाठी जिल्ह्याभरातून लाखो लोक या ठिकाणी येतात.