शिर्डी, शिर्डीच्या साईबाबांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक साईबाबांना (Sai Baba) विविध स्वरूपात दान देत असतात. नुकतच गुरूपोर्णिमा उत्सवाच्या तिन दिवसात भाविकांनी साईबाबांना 5 कोटी 12 लाख रोख दान दिल होत त्यानंतर आज पाऊण किलोचा साईमुकूट डॉ.रामकृष्ण मांबा यांनी दान स्वरूपात दिला आहे.साईबाबांवर आमची निस्सीम श्रद्धा असुन जे काही मागितल्या त्या सर्व मनोकामना पुर्ण झाल्या असे दानशुर भक्त डॉ. रामकृष्ण मांबा यांनी सांगितले.
फकीरी परंपरेत आयुष्य काढलेल्या आणि समाजाच्या भल्यासाठी जीवन खर्ची घातलेल्या साईबाबांच्या खजिन्यात आणखी एका सोन्याच्या हीरेजडीत मुकुटाची भर पडली आहे. हैद्राबाद येथील साईभक्त डॉ. रामकृष्णा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा सुवर्ण मुकट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे. पत्नीची शेवटची इच्छा साईंना मुकूट चढवण्याची होती, ती पूर्ण केल्याचं समाधान साईभक्त डॉ. रामकृष्ण यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
साईबाबांना आज दान स्वरुपात मिळालेला मुकूट अतिशय आकर्षक आहे. मुकुटावर डायमंडचा साज चढवण्यात आला असून, ओम या नावाची छबी रेखाटण्यात आली आहे. तर मुकूटाच्या वरच्या भागाला मोरपिसाने सजवण्यात आलं आहे. हा मुकूट डॉ. रामकृष्ण यांच्या इच्छेनुसार आज मध्यान्ह आरतीदरम्यान मूर्तीवर चढवण्यात आला.