तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई (tiruvannamalai temple) जिल्ह्यात शिवाचे मंदिर आहे. अन्नमलाई पर्वताच्या (annamalai parvat) पायथ्याशी असलेल्या या मंदिराला अरुणाचलेश्वर शिव मंदिर (arunachaleswarar temple) म्हणतात. श्रावणात येथे भाविकांची मोठी गर्दी असते. कार्तिक पौर्णिमेलाही जत्रा असते. येथील अन्नमलाई पर्वताची 14 किलोमीटर लांब प्रदक्षिणा करून भाविक महादेवाला नवस करतात. असे म्हणतात की, महादेवाचे हे जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, एकदा ब्रह्माजींनी कैलास पर्वत पाहण्यासाठी हंसाचे रूप धारण केले, पण तिथपर्यंत पोहोचण्यास ते असमर्थ होते. वाटेत त्यांना एक एव्हड्याचे फुल पडलेले दिसले. त्यांनी त्या फुलाला कैलास पर्वताबद्दल विचारले. तेव्हा ते फुल म्हणाले की, मी येथे चाळीस हजार वर्षांपासून आहे.
यावरून ब्रह्मदेवाला वाटले की, आपले तिथपर्यंत पोहोचणे शक्य नाही. आपण कैलास पर्वत पहिले आहे अशी खोटी साक्ष देण्यासाठी ब्रम्ह देवांनी केवड्याच्या फुलाला राजी केले. ब्रह्मदेवाच्या या गोष्टीचा भगवान शंकरला राग आला. त्याने ब्रह्मदेवाला शाप दिला की, पृथ्वीवर त्यांचे मंदिर बांधले जाणार नाही. त्याचवेळी केवड्याच्या फुलालाही त्यांनी श्राप दिला की, त्याचा शिवपूजेत वापर होणार नाही. ज्या ठिकाणी भगवान शंकराने ब्रह्माजींना शाप दिला होता. ती जागा म्हणजे तिरुवन्नमलाई.
अरुणाचलेश्वर मंदिर डोंगराच्या पायथ्याशी आहे. हा अन्नमलाई पर्वत शिवाचे प्रतीक आहे. पर्वताची उंची 2668 फूट आहे. तिरुवन्नमलाईमध्ये आठ दिशांना आठ शिवलिंगे आहेत. असे मानले जाते की, प्रत्येक लिंगाच्या दर्शनाने अनेक फायदे होतात. कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात दीपदान केले जाते. हे मंदिर पहाटे 5.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले असते.
चेन्नई ते तिरुवन्नमलाई हे अंतर 200 किमी आहे. या ठिकाणी चेन्नईहून बसने पोहोचता येते. चेन्नईहून वेल्लोर मार्गे किंवा चेन्नईहून विल्लुपुरम मार्गे ट्रेननेसुद्धा जात येणे शक्य आहे. शिवाय खाजगी वाहनाचा पर्याय आहेच.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)