कौलेश्वरी पर्वत हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनासाठी ओळखले जाते. हे ठिकाण कौलेश्वरी देवीचे (Kauleshwari Devi) दिव्य दर्शन आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. पर्वताच्या शिखरावर महाभारत (Mahabharat) काळातील भोलेनाथाचे मंदिर असल्याचे मानले जाते. अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिरात महादेवाची पूजा केली होती. सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेल्या कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेकासाठी नैसर्गिक तलाव आहे. येथे भाविक स्नान करून महादेवाला अभिषेक करतात. शिवमंदिरात दर सोमवारी विशेष भजन-कीर्तन होते. सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु आहे. 29 जुलैपासून मराठी म्हणजेच महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण महिना सुरू होतोय. श्रावणात महादेवाच्या दर्शनाला जाण्याला आणि अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात अनेक जण प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी जातात. या निमित्याने TV9 मराठी सातत्याने देशातील प्रसिद्ध मंदिराविषयी माहिती देत आहे.
कौलेश्वरी शिव मंदिराचा इतिहास महाभारत काळापासूनचा आहे. मंदिराशेजारी असलेल्या मांडवा मंडईत अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूचा विवाह राजा विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी झाला होता अशी आख्यायिका आहे.
कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविकांना काहीही घेऊन जाण्याची गरज नाही. मंदिराभोवतीच पूजेचे साहित्य उपलब्ध आहे. स्थानिक नागरिक मंदिराच्या आवारातून फुले, बेलची पाने आणि पाणी विकत घेऊन महादेवाला अर्पण करतात.
पौराणिक मान्यतेनुसार, पांडवांनी अज्ञातवासात असताना या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली होती अशी आख्यायिका आहे. याशिवाय भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनीसुद्धा वनवासाच्या काळात या मंदिरात वेळ घालविल्याचे सांगण्यात येते. भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दर सोमवारी भाविक भजन-कीर्तन करतात.
चतरा येथील कौलेश्वरी पर्वतावर एक तलाव असून भोलेनाथाच्या अभिषेकासाठी भक्त येथून पाणी नेतात. कोलुआ पर्वतावर वसलेल्या या भोलेनाथाच्या मंदिरात भाविकांना बाहेरून काहीही आणण्यास मनाई आहे कारण मंदिराजवळच पूजेचे साहित्य उपलब्ध आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)