ज्योतिषांच्या मते, श्रावण महिन्यात काही खास गोष्टी घरी आणल्याने सुख-समृद्धी वाढते. 14 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत हिंदी भाषिक लोकांचा श्रावण महिना (Shrawan Month) असणार आहे. श्रवणामध्ये भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्व सांगितले आहे. श्रावण सोमवारी (Shrawan sonwar 2022) भगवान शंकराची आराधना केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या शुभ मुहूर्तावर शिवलिंगावर जल, दूध, धतुरा, भांग, बेलपत्र इत्यादी अर्पण केल्यास सर्व संकट दूर होतात. ज्योतिषांच्या मते, श्रावणामध्ये काही खास गोष्टी घरी आणल्याने सुख-समृद्धी वाढते अशी मान्यता आहे. भस्म- शास्त्रानुसार जिथे इतर देवी-देवतांना सुंदर वस्त्र आणि अलंकार आवडतात, तिथे भगवान शिवाचे रत्न अतिशय वेगळे आहे. भगवान शिव यांना भस्म खूप खूप प्रिय आहे. हे भस्म ते त्यांच्या शरीरावर लावतात. श्रावण महिन्यात तुम्ही भस्म घरी आणू शकता. पूजेच्या दुकानात भस्म विकत मिळते. शिवलिंगावर भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.
त्रिशूल हे भगवान शंकराचे शस्त्र आहे. असे म्हटले जाते की ज्या घरात भगवान शंकराचे त्रिशूळ असते त्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी तुम्ही चांदीचा त्रिशूळ आणून मंदिरात ठेवू शकता. जर तुम्हाला चांदीचे त्रिशूल खरेदी करता येत नसेल तर तुम्ही तांब्याचे त्रिशूळ देखील घेऊ शकता.
महादेवाची पूजा चांदीच्या बेलच्या पानांशिवाय अपूर्ण आहे. श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शंकराला चांदीचे बेलपत्र अर्पण करू शकता. घरातील मंदिरात चांदीचे बेलपत्र ठेवल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते.
नाग हे शिवाचे अलंकार मानले जाते. श्रवणामध्ये चांदीची किंवा तांब्याची नाग-नागिन जोडी घरी आणणे खूप शुभ असते. घराच्या मुख्य दरवाजाखाली ही नागाची प्रतिकृती पुरावी. यामुळे कामात येत असलेला अडथळा दूर होतो आणि नकारात्मक ऊर्जाही घरातून निघून जाते.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार जिथे भगवान शंकराचे अश्रू पडले तिथे रुद्राक्षाचा जन्म झाला. श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी आणू शकता. रुद्राक्ष घरात ठेवल्याने धन आणि अन्नधान्य वाढते. जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
श्रावण महिन्यात गंगाजल घरी आणणे खूप शुभ मानले जाते. भगवान शिव किंवा शिवलिंगाचा जलाभिषेक गंगाजलाने केला जातो. श्रवा महिन्यात भगवान शंकराचे भक्त गंगाजल घरी आणतात. हे गंगाजल प्रथम भगवान शंकराला अर्पण केले जाते त्यानंतर ते देवघरात ठेवले जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)