महादेवाचा (Mahadev) प्रिय महिना कालपासून सुरू झाला आहे. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण श्रावणामध्ये (Shrawan 2022) त्यांची पूजा करतात. भोलेनाथांना श्रवणामध्ये जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जर भगवान शंकराला त्यांची आवडती वस्तू अर्पण केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. इच्छित फळ मिळण्यासाठी भक्तांनी पूजेत शंकराची आवडती फुले अर्पण करावीत. यामुळे अनेक फायदे होतात.
शिवाचा आवडता रंग पांढरा आहे. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फूल अर्पण करावे. भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
शिवाला चमेलीचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते. महादेवाच्या कृपेने भक्ताला वाहन सुख मिळते.
वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी श्रवणामध्ये महादेवाला सारंगी फूल अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात. विवाह जुळण्यात अपयश येत असल्यास यामुळे विवाहयोग जुळून येतो.
श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे फूल अर्पण करा. शिवाला शुभ्र मोगरा अर्पण करणे उत्तम. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते. तसेच भगवंताला बेला पत्र अर्पण करा.
कणेरचे फूल शिवासह सर्व देवतांना प्रिय आहे. शिवलिंगावर कणेरचे फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात. दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडावर कमरेचे फुल वाहावे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)