14 जुलै 2022 पासून हिंदी भाषिकांचा श्रावण महिना (Shrawan 2022) सुरू झाला आहे. 12 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असेल. भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास (Shrawan somwar puja) करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात, केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल, ते सविस्तर जाणून घेऊया. भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात, दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात.
श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी.
श्रावण महिन्यात देवी सतीने दुस-या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली, श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर अवश्य करायला हवा. असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)