मुंबई : 18 जुलैपासून श्रावण (Shrawan 2023) महिन्याला सुरूवात होत आहे. झाडांची हिरवळ आणि पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. श्रावण महिन्याला भगवान शिवाचा महिना म्हणतात. या महिन्यात जे खऱ्या भक्ती भावाने पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना शिव पूर्ण करतात. भक्त आपल्या शक्ती आणि इच्छेनुसार भगवान शंकराची आराधना करतात. या महिन्यात माता पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि नंदी महाराज यांची देखील पूजा केली जाते. त्याची पूजा करून जल अर्पण केल्याने भोलेनाथाची पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळते. नंदी महाराज भोलेनाथांना प्रिय मानले जातात आणि धार्मिक मान्यतेनुसार महादेव नंदीने सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही. भक्तांच्या मनातील इच्छा भगवान शिवापर्यंत पोहचवण्यासाठी नंदी हे माध्यम बनतात.
श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाच्या मंदिरात शिवलींगाला जलाभिषेक करावा आणि उरलेले पाणी भोलेनाथाच्या समोर असलेल्या नंदीच्या चरणी अर्पण करावे. त्यानंतर नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगा. भोलेनाथांकडून जे काही मागायचे आहे ते नंदीच्या कानात सांग. असे मानले जाते की नंदी ही प्रार्थना भगवान शंकराला सांगतात आणि देव ती इच्छा पूर्ण करतात. एवढेच नाही तर त्याच्याद्वारे भगवंतापर्यंत पोहोचणारी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते. नंदी महाराज शिवाला अत्यंत प्रिय आहेत, नंदी हे शिवाचे वाहन आहे.
इच्छा सांगतांना ती नंदीच्या डाव्या कानात सांगावी. प्रार्थना करतांना दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमची प्रार्थना ऐकू शकणार नाही. नंदीच्या कानात प्राथना सांगितल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)