मुंबई : भगवान शिवासारखे दानशूर दैवत नाही. विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी विष देखील ग्रहण केले होते. तांब्याभर पाण्याचा जलाभिशेक केल्याने देखील आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची प्रार्थना पुर्ण करतात. यामुळेच संपूर्ण श्रावण (Shrawan 2023) महिन्यात महादेवाचे भक्त त्यांची वेगवेगळ्या रूपात पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार जो कोणी भक्त श्रावण महिन्यात खऱ्या मनाने शिव साधना करतो, त्याला महादेवाची विशेष कृपा लाभते. श्रावणात भगवान शिवाच्या विविध रूपांची पूजा करण्यामागील कारण काय आहे आणि भगवान शंकराच्या कोणत्या रूपाची पूजा केल्याने काय फळ मिळते, चला जाणून घेऊया.
भगवान शिवाच्या महामृत्युंजय मंत्रामध्ये त्र्यंबक हा शब्द आढळतो, जो भगवान शिवाचे नाव आहे. महाराष्ट्रात शिवाचे त्र्यंबक नावाचे ज्योतिर्लिंगही आहे. हिंदू मान्यतेनुसार, महामृत्युंजय मंत्राच्या पठणामुळे प्रसन्न होऊन महादेवाने मार्कंडेय ऋषींचे प्राण यमराजापासून वाचवले होते, श्रावण महिन्यात पूजा केल्यास मृत्यूसह सर्व भय नाहीसे होतात. भगवान शंकराच्या कृपेने साधकाच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे भय राहत नाही.
हिंदू मान्यतेनुसार, जेव्हा समुद्रमंथनानंतर हलहल विष बाहेर पडले तेव्हा भगवान शिवाने संपूर्ण विष प्याले आणि विश्वाला त्याच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी ते आपल्या घशात बंद केले, ज्यामुळे त्यांचा घसा निळा झाला. यानंतर महादेवाचे भक्त त्यांना नीलकंठ म्हणत त्यांची पूजा करू लागले. हिंदू मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात भगवान नीलकंठाची पूजा केल्याने जीवनातील सर्वात मोठे दुःखही क्षणार्धात दूर होतात.
हिंदू मान्यतेनुसार, भगवान शिवाला तीन डोळे आहेत जे सत्त्व, रज आणि तम गुणांसह भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानाचे प्रतीक आहेत. भगवान शंकराचे हे डोळे स्वर्ग, मृत्यू आणि नरक यांचेही प्रतीक मानले जातात. हिंदू मान्यतेनुसार महादेवाचा तिसरा डोळा नेहमी बंद असतो कारण तो उघडताच विनाश होतो. हिंदू मान्यतेनुसार भगवान शिवाचा तिसरा डोळा इतका शक्तीशाली आहे की हिमालयासारखा पर्वतही जळू लागतो. सनातन परंपरेत शिवाच्या त्रिनेत्रधारी रूपाची पूजा केल्याने साधकाला सत्त्व, रज आणि तम हे गुण प्राप्त होतात.
असे मानले जाते की जेव्हा माता गंगा भगवान विष्णूच्या कमंडलातून बाहेर पडली आणि स्वर्गातून पृथ्वीवर वाहू लागली तेव्हा तिचा वेग पाहून देवता घाबरले. यानंतर माता गंगेचा वेग कमी करण्यासाठी महादेवाने तिला जटांमध्ये गुंडाळले. या संपूर्ण प्रसंगानंतर भगवान शंकराची गंगाधर रूपात पूजा करण्यात आली. असे मानले जाते की शिवाच्या गंगाधर रूपाची पूजा केल्याने साधकाला श्रावण महिन्यात कंवर यात्रेसारखे पुण्य प्राप्त होते.
भगवान शिव चंद्राला डोक्यावर धारण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हे मनाचे प्रतीक आहे. अशा स्थितीत श्रावण महिन्यात महादेवाच्या शशिधर रूपाची पूजा केल्यास भगवान शिव त्याच्या मनातील इच्छा लवकर पूर्ण करून सुख आणि सौभाग्य प्रदान करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)