Shrawan 2023 : महादेवाला का वाहतात धोत्र्याचे फळ? अशी आहे यामागची पौराणिक कथा

| Updated on: Jul 26, 2023 | 4:26 PM

भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात. आज आपण भगवान शंकराला भांग आणि धतुरा का अर्पण केला जातो याबद्दल जाणून घेणार आहोत.

Shrawan 2023 :  महादेवाला का वाहतात धोत्र्याचे फळ? अशी आहे यामागची पौराणिक कथा
महादेव
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : देवांचे देव महादेवाला भांग, धोत्र्याचं फळ, बेलपत्र आणि जल अर्पण केले जाते. भगवान शंकराच्या पूजेसाठी या वस्तू असणे अनिवार्य आहे. महादेवाला श्रावण (Shrawan 2023) महिना अतिशय प्रिय आहे. भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व रखडलेली कामे पूर्ण होतात. आज आपण भगवान शंकराला भांग आणि धतुरा का अर्पण केला जातो याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया भक्तांबर शिघ्र प्रसन्न होणाऱ्या भगवान शंकराच्या शिवलिंगावर भांग आणि धतुरा का अर्पण केला जातो.

भांग आणि धोत्रा अर्पण करण्यामागे हे आहे कारण

शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची प्रसिध्द पौराणिक कथा आहे. असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसात वाटून घेतले. समुद्रमंथनात विषाचा प्यालाही बाहेर आला, जो कोणीही घेण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले. अशा स्थितीत भगवान शिव ते विष प्याले. विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या घशात स्थिर केले होते.

भांग आणि धोत्रा वापरण्याचे हेच कारण आहे

विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले होते. त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते. अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला होता. तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचं फळं अर्पण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

याशिवाय शिवलिंगावर भांग धतुरा अर्पण करण्याची आणखी एक कथा आहे. महादेव नेहमी ध्यानात मग्न असत. कैलास पर्वतावर ते तप करत असत. कैलास पर्वतावर प्रचंड थंडी आहे. अशा थंडीत उघड्या अंगाने शिवजी तपश्चर्या करत होते. अशा स्थितीत त्याला ऊब देण्यासाठी भांग आणि धतुर्‍याचा वापर केला. आजही हिमालयातील भिक्षू त्याचे सेवन करून स्वतःला उबदार ठेवतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)