हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या वर्षी श्रावण मास किंवा श्रावण महिना 29 जुलैपासून सुरू होत आहे (Shrawan somwar 2022) आणि श्रावणाचा शेवटचा दिवस 27 ऑगस्ट रोजी येईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना असतो. यंदा श्रावण, विषकुंभ आणि प्रीति योगात होत आहे.
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण महत्त्व आहे या महिन्या मध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदीत करतात तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. तसेच हा महिना अत्यंय हर्षोउल्हासात जातात.वण मासामध्ये निसर्ग देखील बहरून निघतो व या महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते.
श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर, पोळा असे अनेक सण येतात. अनेक महिला या महिन्यात देव- देवतांची उपासना करतात. असा हा श्रावण महिना सर्वत्र आनंद, उत्साह पसरवतो. प्रत्येकास नवचैतन्य देतो, सर्वाना तो हवाहवासा वाटतो. शिवामुठच्या व्रताने दर सोमवारी तांदुळ, तीळ, मुग, जवस आणि सातु अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. त्यानंतर श्रावणातील शुक्ल पक्षात येणार्या पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा‘ (Narali pornima 2022) म्हणून ओळखले जाते. समुद्र किनारी राहणा-या कोळी बांधवासाठी हा खास सण ज्याच्यावर संपूर्ण कुंटूबाचे जीवन अवलंबून असते अशा या समुद्राला यादिवशी प्रेमाने नारळ अर्पण केला जातो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)