मुंबई : भगवान श्रीकृष्णांचा (Shri Krushna Janmashtami) जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. या दिवशी त्यांचा जन्मदिवस जगभरात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले. त्यामुळे जन्माष्टमी साजरी करताना रोहिणी नक्षत्रही ध्यानात ठेवले जाते. यंदा जन्माष्टमीच्या तारखेबाबत मोठा गोंधळ आहे. कोणी जन्माष्टमीचा सण 6 सप्टेंबर तर कोणी 7 सप्टेंबरला सांगत आहेत. जन्माष्टमीची नेमकी तारीख कोणती आहे ते जाणून घेऊया.
यावेळी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03.38 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 04.14 वाजता समाप्त होईल. या काळात संपूर्ण रात्रभर रोहिणी नक्षत्र राहील. ज्योतिषांच्या मते, यावर्षी गृहस्थ 6 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी करतील. तर वैष्णव संप्रदायातील लोकं 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत.
ज्योतिषांचे म्हणणे आहे की, यावर्षी घरगुती जीवनातील लोक 6 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव साजरा करतील. जन्माष्टमीच्या पूजेसाठी 6 सप्टेंबर रोजी रात्री 11.56 ते 12.42 पर्यंत सर्वोत्तम शुभ मुहूर्त असेल.
साधारणपणे जन्माष्टमीला बालकृष्णाची स्थापना केली जाते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवी ती मुर्ती स्थापित करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती स्थापित करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसाठी बाल कृष्णाची मूर्ती बसवू शकता. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही कामधेनू गायीसोबत बसलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती बसवू शकता.
जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या श्रृंगारात भरपूर फुलांचा वापर करा. देवाला पिवळे वस्त्र आणि चंदनाच्या सुगंधाने सजवा. यामध्ये काळा रंग अजिबात वापरू नका. श्रीकृष्णाला कर्दळीचे फुले अर्पण केल्यास उत्तम.
जन्माष्टमीला श्रीकृष्णाला पंचामृत अवश्य अर्पण करा. त्यामध्ये तुळशीची पानेही अवश्य टाका. सुका मेवा, लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवा.
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास व पूजेचा संकल्प घ्यावा. दिवसभर पाणी किंवा फळांचे सेवन करा. मध्यरात्री कृष्णाची धातूची मूर्ती भांड्यात ठेवावी. पंचामृताने स्नान करा. यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे. षोडशोपचार पूजा करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)