लक्ष्मी
Image Credit source: Social Media
मुंबई : घरात सुख-शांती राहावी, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी लोकं रोज पूजा करतात आणि उपवास करतात. यासोबतच शुक्रवारी सूर्यास्तानंतर काही उपाय केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद (Shukrawar Upay) प्राप्त होतो. लक्ष्मीला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो. जर तुम्हाला तुमचे घर धन-संपत्तीने भरलेले आणि कुटुंबात सुख-शांती राहावी, असे वाटत असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच संध्याकाळी या गोष्टी अवश्य करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतील.
हा उपाय शुक्रवारी सूर्यास्तानंतर करा
- शुक्रवारी सूर्यास्त होताच घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते.
- आज, शुक्रवारी सूर्यास्त होताच सात दिवे ईशान्य कोपऱ्यात ठेवा. तसेच दिव्यात चिमूटभर केशर घाला. शुक्रवारी हा उपाय केल्याने धन आणि संपत्तीमधील सर्व अडथळे दूर होतात.
- या दिवशी संध्याकाळी कुटुंबासह माता लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मीला पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करा. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
- या दिवशी कोणतीही गोष्ट उधार देणे व घेणे टाळावे. विशेषत: सूर्यास्तानंतर कोणालाही उधार देऊ नका. असे केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊन कर्जाचा बोजा वाढू लागतो. सूर्यास्तानंतर काही हवे असल्यास पैसे देऊनच खरेदी करा.
- सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार होणार नाही याची विशेष काळजी घ्या. सूर्यास्त होताच घराचा मुख्य दरवाजा, पूजेची खोली, स्वयंपाकघर आणि अंगणात दिवे लावावेत. तसे न केल्यास घरात गरिबी येते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)