मुंबई : नारायण विष्णु धर्माधिकारी (Narayan Dharmadhikari) ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म मार्च 1, 1922 झाला. ते समर्थ (Samarth) रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत काम केले. धर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव “शांडिल्य” असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने ‘धर्माधिकारी’ अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले.
जीवनकार्य
समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत .
बैठक
या कामासाठी त्यांनी 1943 साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्रीसमर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या माध्यमातून सोमवार दिनांक 8 ऑक्टोबर 1943 ( विजयादशमी ) रोजी मुंबई येथील गोरेगांव येथे प्रथम श्रीबैठक सुरू करण्यात आली. 2008 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधित बातम्या :
सर्व अपुऱ्या इच्छा पूर्ण होतील, केशराचे हे उपाय नक्की करुन पाहा
महादेवाच्या पंचाक्षर स्तोत्राने अशक्य गोष्टी शक्य होतील, महाशिवरात्रीला ‘हा’ पाठ नक्की वाचा!