नवी दिल्ली : दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज 25 ऑक्टोबरला देशात आणि जगात सूर्यग्रहण होणार आहे. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण(Surya Grahan 2022 ) आहे. हे ग्रहण भारतातील काही शहरांमधून पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. कारण, असे ग्रहण पुढील दशकभर भारतातून दिसणार नाही. देशाच्या राजधानीसोबत हे ग्रहण जयपूर, कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर आणि द्वारका येथूनही दिसणार आहे.
ग्रहणकाळात भारतातील लोकांना फक्त 43 टक्के मंद सूर्यच दिसणार आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
नेमक कसं असत आंशिक सूर्यग्रहण
सूर्य हा आपल्या कक्षेत फिरत असतो. मात्र, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा आपण सूर्य पाहू शकत नाही. या खगोलीय स्थतीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्याच्या काही किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.
अशा प्रकारचे सूर्यग्रहण भारतात 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसणार आहे.
भारतातील वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सुरू होणार आहे. हे ग्रहण सुमारे 04 तास 03 मिनिटे चालणार आहे. संध्याकाळी 6.32 वाजता ग्रहण संपणार आहे.
शहर | ग्रहणाटी वेळ |
---|---|
मुंबई | दुपारी 4,49 |
नागपूर | दुपारी 4,49 |
दिल्ली | दुपारी 4.29 |
चेन्नई | सायंकाळी 5.14 |
हैदराबाद | दुपारी 4.59 |
जयपूर | दुपारी 4.31 |
कोलकाता | दुपारी 4.52 |
द्वारका | दुपारी 4.36 |
सिलीगुडी | दुपारी 4.41 |
तिरुवनंतपुरम | सायंकाळी 5.29 |