surya grahan 2022 : आपल्या देशात अनेक गोष्टी धार्मिक आणि सामाजिक गोष्टी लगेच आणि निकराने पाहिल्या जातात. जर ती धार्मिक (Religious) असेल तर जरा जास्तच लक्ष दिले जाते. त्यातच आता देशात वर्षातील पहिले ग्रहन सुरू होणार असून लोक त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत नाहीत. हिंदु धर्मांत ग्रहण (Eclipse) लागणे हे शुभ मानले जात नाही. कारण शास्त्रांत लिहले आहे की यावेळी देव देवतांना हानी पोहचते. त्यातच जर शनिशी निगडीत विशेष काही असेल तर मग काही खरं नाही. त्यातच आज लागणारे सुर्य ग्रहन हे शनि आमावस्येला लागत आहे. त्यामुळे अनेकांना सुर्य देवासह शनिलाच्याही प्रकोपाला तोंड द्यावे लागले. तर या वर्षीतील पहिले ग्रहन जे सुर्य ग्रहन (Solar eclipse) आहे ते आज सुरू होत आहे. ते आज मध्यरात्री १२.१५ मिनिटांनी लागेल ते १ मे ला पहाटे ४ वाजून ८ मिनिटांनी संपनार आहे. त्यामुळे ग्रहनाबरोबरच अनेकांना शनि अमावस्याचे परिनाम ही झेलावे लागतील. जर आपल्या शनिवारी शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचायचे असेल तर त्याची कृपादृष्टी आपल्यावर हवी असेल तर ग्रहनाच्या दिवशी पुजा पाठ कराच. त्याचबरोबर दानधर्म ही करा.
देशात सुर्यग्रहनाबरोबरच शनि अमावस्या ही होणार आहे. त्यामुळे लोक सुर्यदेवाबरोबरच आता शनिदेवाचीही पुजाअर्चा करण्यासाठी तयार आहेत. खास करून शनिची वक्रदृष्टी आपल्यावर पडू नये म्हणून त्याच्या साडेसातीपासून आपला बचाव व्हावा म्हणून काय करता येईल याची तपासणी ते करत आहेत. तर चला मग आम्ही तुम्हाला सांगू की तुम्ही असे काय करू शकता. ज्यामुळे तुम्ही शनिला प्रसंन्न करू शकता
शनि देवाची कृपा तर सुर्य देवाची शांत काया आपल्यावर रहावी म्हणून मोहरीच्या तेलाला विशेष महत्व आहे. तर तुम्ही या खास दिवशी या देवांना प्रसन्न ठेवणार असाल तर नक्कीच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच वाटतं असेल तर शनिच्या देवालयात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि प्रार्थना करा की जीवनात सुख आणि शांती लाभू दे. काळा रंग हा शनिला अतिप्रिय आहे. त्यामुळे शनिला काळे कापड वाहिलं जातं
असे म्हटले जाते की शनिच्या साडेसाती पासून वाचायचे असेल तर हनुमानाच्या शरनात जावा. कारण हनुमान यांना वरदान मिळाला होता की, जो कोणी हनुमानाची पुजा करेल त्यांच्या शरनात जाईल त्याला शनिच्या साडेसाती लागणार नाही. त्यामुळे शनिच्या पुजेसह हनुमानाची पुजा गरजेची आहे. त्यामुळे ग्रहनासह शनिच्या अमावस्येला हनुमान चालीसाचे पठन करावे आणि बजरंगबलीचा सेंदूर लावावा. हनुमान यांना सुर्यपुत्र म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही या सुर्यग्रहनात हनुमानाची आराधना करू शकता.
हिंदू धर्मात दानधर्म करण्याला विशेष महत्व आहे. दानधर्म केल्याने आपल्याला पुन्य मिळते. त्यामुळे मोक्ष प्राप्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे शनि अमावस्येला काळे कापड, काळे तिळ आणि काळे हरभरे दान करण्याला अधिक महत्व आहे. त्यामुळे हे सगळं आधी शनिदेवाच्या समोर ठेवा आणि त्यानंतर ते गरिबांमध्ये ते दान करा. तसेच असे दान तुम्ही केल्याने फक्त शनिच प्रसंन्न होइल असे नाही तर सुर्य देवाची कृपा ही आपल्यावर राहील.