मुंबई : पितृपरीक्षा ही पितरांना समर्पित आहे. यंदा पितृपक्षातच (Sarvapitu Amavasya) वर्षातील दुसरे सूर्य ग्रहण (second Solar Eclipse) होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी सर्वपितृ अमावस्येला होणार आहे. शास्त्रामध्ये सूर्यग्रहण अशुभ मानले गेले आहे कारण ग्रहणातून निघणारी नकारात्मक ऊर्जा प्रभावीत करते. ग्रहण काळात पूजा, पठण, शुभ कार्ये होत नाहीत. आता अशा परिस्थितीत सर्वपितृ अमावस्येला लोकं श्राद्ध करू शकतील की नाही, सूर्यग्रहण कधी होईल हे जाणून घेऊया.
14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन अमावस्या म्हणजेच सर्वपित्री अमावस्या, वर्षातील दुसरे सूर्यग्रहण रात्री 8:34 पासून सुरू होईल आणि मध्यरात्री 2:25 वाजता संपेल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल जे कन्या आणि चित्रा नक्षत्रात होईल. तथापि, ते भारतात दिसणार नाही, म्हणून त्याचा सुतक कालावधी पाळला जाणार नाही.
हिंदू धर्मानुसार, जर कोणत्याही कारणास्तव या तिथीला तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध करू शकत नसाल, तर सर्वपितृ अमावस्येला तुम्ही पिंडदान करू शकता, यामुळे त्यांना समाधान मिळते आणि ते तुमच्यावर प्रसन्न होतात. या दिवशी सूर्यग्रहण रात्री होत असून श्राद्ध विधी दुपारी केले जातात, त्यामुळे सूर्यग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही. या दिवशी तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय तर्पण आणि पिंडदान करू शकता.
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. क्युबा, बार्बाडोस, पेरू, यूएसए, अर्जेंटिना, कॅनडा, मेक्सिको, हैती, बहामास, अँटिग्वा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जमैका, पॅराग्वे, ग्वाटेमाला, ब्राझील, कोलंबिया, उरुग्वे, डोमिनिकन, यांसारख्या ठिकाणी वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण पाहायला मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)