शिवलिंग
Image Credit source: Social Media
मुंबई, हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवार हा भगवान शिवाला (Somvar Upay) समर्पित आहे. या दिवशी खऱ्या मनाने शिवाची उपासना करणार्या भक्तांवर देवाचा कृपावर्षाव होतो. काही लोकं सोमवारीही उपवास करतात. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी आणि लक्ष्मी वास करते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. देवांचे देव महादेव ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे.
जाणून घेऊया या उपायांबद्दल
- सोमवारी या दिशेला तोंड करून पूजा करा: ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी उत्तरेकडे तोंड करून पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी जो कोणी उत्तरेकडे तोंड करून ‘ओम नमः शिवाय’ 11, 21, 51 किंवा 108 वेळा जप करतो, त्याच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात.
- भगवान शिवाचा या प्रकारे अभिषेक करा: ज्यांना मानसिक तणाव आहे, त्यांनी सोमवारी भगवान शिवाला अभिषेक करावा. या दिवशी दुधात साखर मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा. मानसिक ताणतणाव दूर करण्यासोबतच मनालाही तीक्ष्ण करते. या दिवशी जो कोणी भक्त दुधात साखर मिसळून शिवाला अभिषेक करतो, त्याची अहोरात्र प्रगती द्विगुणित होते, असे मानले जाते. समृद्धीसाठी सोमवारी काय करावे आणि काय करू नये.
- पंचामृताने अभिषेक: जो कोणी सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करतो त्याचे सर्व रोग नष्ट होतात. यासोबतच सोमवारी ‘दरिद्र दहन शिवस्त्रोत’ पठण करावे. यामुळे आर्थिक फायदा होतो.
- शिव तांडव स्त्रोत्र: सोमवारी भगवान शंकराची विधिवत पूजा करून ‘शिव तांडव स्त्रोत्र’ पठण केल्याने धनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
- कुंडलीतील कमकुवत चंद्रही होईल बलवान: ज्योतिष शास्त्रानुसार सोमवारी ‘चंद्रशेखर स्तोत्र’ पाठ केल्याने तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते. याशिवाय सोमवारी रामायणातील अयोध्या कांडाचे पठण करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)