शिवलिंग
Image Credit source: Social Media
मुंबई, हिंदू धर्मात आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशिष्ट देवतेची पूजा केली जाते. सोमवारचा दिवस (Somwar Upay) भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर दूध, बेलपत्र, भांग आणि धतुरा यांचा अभिषेक करतात. काही लोकं या दिवशी शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास देखील करतात. या दिवशी केलेल्या उपायांनी भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात, असे मानले जाते. त्याच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. सोमवारी केलेल्या उपायांमुळे मार्गातले अडथळे दुर होतात आणि प्रसन्न होऊन शिव आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
सोमवारी करा हे उपाय
- सोमवारी भगवान शंकराची मनापासून उपासना करावी. आज शिवलिंगावर चंदन, अक्षत, दूध, धतुरा, गंगाजल, बेलपत्र आणि अर्पण करा.
- सोमवारी भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी शिव चालीसा वाचून शिव आरतीही करावी. यामुळे घरात सुख-शांती राहते.
- मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष कालची पूजा करणे शुभ मानले जाते. प्रदोष काळात केलेल्या शिवाच्या उपासनेने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करतात.
- सोमवारी दान करणे देखील खूप महत्वाचे आहे. असे मानले जाते की, या दिवशी संध्याकाळी काळे तीळ आणि कच्चा तांदूळ दान केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. एवढेच नाही तर पितृदोषाचा प्रभावही कमी होतो.
- या दिवशी दही, पांढरे वस्त्र, साखर आणि दूध दान केल्याने शिव भक्ताला इच्छित वरदान देतात. सोमवारी शिवरक्षेचा पाठ केल्यास सर्व आर्थिक समस्या दूर होतात.
- चंद्रदोषाचा प्रभाव दूर करण्यासाठी सोमवारचा दिवसही खूप शुभ आहे. यासाठी सोमवारी चंदनाची लस लावावी व पांढरे वस्त्र परिधान करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)