मुंबई : सोमवार हा देवादी देव महादेवाला समर्पित आहे. या दिवशी महादेवाची विधीवत आराधना केल्यास इच्छित फळ प्राप्त होते. देवलोकातील सर्व देवतांमध्ये भगवान शिव सर्वात सहज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. फक्त जलाभिषेक केल्याने देखील महादेव भक्तांवर प्रसन्न होतात.
दुसरीकडे अनेक जण सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा करतात. याशिवाय महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर या दिवशी काही खास उपायही करता येतात. या उपायांनी तुमचे कोणतेही काम यशस्वी रित्या पार पडते. यासोबतच तुम्ही जर मानसिक समस्यांचा सामना करत असाल तर त्यापासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही प्रभावी उपायांबद्दल (Somwar Upay).
गायत्री मातेला वेदमाता म्हणतात. आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी सोमवारी माँ गायत्री किंवा माँ सरस्वतीच्या चित्रासमोर बसून गायत्री मंत्राचा 11, 21 किंवा 51 वेळा जप करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि लवकरच यशाचे दरवाजे उघडतील.
गायत्री मंत्र – ‘ॐ भूर भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयत’ असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील आणि तुमची जीवनात प्रगती होईल.
प्रत्येकाला आयुष्यात प्रगती हवी असते तसेच कुटुंबातही आनंद हवा असतो. म्हणूनच ज्योतिष शास्त्रानुसार कौटुंबिक सुख टिकवायचे असेल तर सोमवारी शमीच्या झाडाचे ध्यान करावे आणि दोन मिनिटे हात जोडून त्या झाडाला नमस्कार करावा. असे केल्याने तुमचा कौटुंबिक आनंद कायम राहील.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वैवाहिक जीवनाला एखाद्याची वाईट नजर लागली आहे आणि पती-पत्नीमध्ये प्रेमाची कमतरता आहे, तर तुम्ही या राहूच्या मंत्राचा 5 वेळा जप करावा.
राहु मंत्र- ‘ओम भ्रम भ्रम स: राहावे नम:’ असे केल्याने तुमच्या वैवाहिक नात्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही मानसिक समस्यांनी त्रस्त असाल आणि तुमचे काम नीट होत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर थोडेसे दूध पाण्यात मिसळून अभिषेक करा. या उपायाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)