मुंबई, अमावास्येचा महिना आला तरी फाल्गुन महिन्यात (Falgun Month) येणारी अमावस्या खूप खास असते. यावर्षी हा शुभ दिवस 20 फेब्रुवारीला येत आहे. सोमवारी अमावस्या असल्याने याला सोमवती अमावस्या म्हणतात. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ मिळते, असे सांगितले जाते. सोमवती अमावस्येच्या दिवशी दान व्यतिरिक्त स्नान आणि तर्पण यांचेही विशेष महत्त्व आहे.
सोमवती अमावस्येला भगवान भोले शंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी शिव गौरीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा दूध, पाणी, फुले, अक्षत, चंदन इत्यादींनी करतात आणि कच्च्या सुती धाग्याला गुंडाळून झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घालतात. तसेच या दिवशी मौन पाळण्याची परंपरा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पूजा-पाठ, दान आणि अर्पण केल्यास विशेष फळ मिळते. या दिवशी भगवान भोलेनाथाची विधिवत पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)