नखे आणि केस कोणत्या दिवशी कापावे याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो (Right day to cut hair). साधारणतः नखे व केस कोणत्या दिवशी कापू नये याबद्दल सगळीकडे माहिती दिलेली असते, पण कोणत्या दिवशी कापावे याबद्दल कोणालाच फारशी माहिती नसते. आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या दिवशी नखे व केस कापणे शुभ असते. विशेष म्हणजे हिंदु धर्मात शास्त्रानुसार महिन्यातील कशी दिवस असे असतात की क्या दिवशी नखे व केस कापले तर शुभ असतेच पण विशेष लाभ देखील होत असतो, अशी मान्यता आहे. महिन्यातील या काही विशिष्ट दिवशी केस कापले तर प्रतिष्ठा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी सहज मिळू शकतात. आठवड्यातून दररोज केस किंवा नखे कापण्याचे वेगळे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक दिवसाचा वेगळा परिणाम होतो. कोणत्या दिवशी नखे व केस कापल्याने फायदा होऊ शकतो आणि कोणत्या दिवशी नुकसान होऊ शकते.
- सोमवार या दिवशी केस कापल्याने आपल्या आरोग्यवर परिणाम होतो. हिंदू धर्मात हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी केसं आणि नख कापणे अशुभ मानल्या जाते.
- मंगळवार या दिवशी केस किंवा दाढी कापणे याचा परिणाम तुमच्या वयावर होतो. या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे वय कमी होते. याशिवाय या दिवशी नखे कापल्याने शरीरात रक्ताशी संबंधित आजार होतात. त्यामुळे या दिवशी केस, नखे आणि दाढी कापू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.
- बुधवार या दिवशी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते. या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये आशीर्वाद राहतो आणि धन मिळण्याचीही शक्यता असते. म्हणजेच केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे.
- शुक्रवार हा दिवस सौंदर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी नखे आणि केस कापून तुम्हाला अनेक चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच धन आणि कीर्तीही वाढते. बरहलाल या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे सजावटीचे काम कोणत्याही भीतीशिवाय करू शकता.
- शनिवारी या दोन्ही गोष्टी करणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यू होऊ शकतो. याशिवाय ज्यांना सांधेदुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी या दिवशी हे काम केल्याने त्यांचे आजार वाढू शकतात. त्यामुळे शनिवारीही केस आणि नखे कापू नका.
- रविवार या दिवशी अनेक जण केस व नखे कापतात पण हा दिवस देखील या कामासाठी अशुभ मानला जातो. वास्तविक पाहता या दिवशी केस कापल्याने बुद्धी, धर्म आणि संपत्ती नष्ट होते. त्यामुळे या दिवशी चुकूनही केस कापू नये.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)