जे वाईट ठिकाणी राहतात त्यांच्यापासून दूर राहणे चांगले. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. वाईट ठिकाणी राहणारे लोक देखील तिथल्या वाईट गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. जर तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात तर तुमची विचारसरणीही त्यांच्यासारखीच वाईट आणि खराब होईल. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले.
ज्या व्यक्तीची नजर वाईट आहे, तो सहवासातच काय तर, तो तुमच्या आसपासही राहण्यास लायक नाही. अशा लोकांसोबत राहणाऱ्यांचीही त्याच्यामुळे निंदा होते. ते तुमच्या घरी आले तर घरातील सदस्यांकडेही चुकीच्या नजरेने पाहतात.
आचार्यांचा असा विश्वास होता की या जगातील सर्वात मोठा शाप म्हणजे गरिबी आहे. जर तुम्ही गरीब असाल तर कष्ट करा आणि गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करा कारण या जगात निर्धन माणसाला कोणत्याही प्रकारचे सुख मिळवण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे मेहनत करा आणि परिस्थिती बदला.
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.