मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात , उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. रविवारचा दिवस हा भगवान सूर्याला समर्पित असतो ( Water To Sun). या दिवशी विधीवत भगवान सूर्याची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्य मंत्राचा जप केल्याने जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट होते. या दिवशी पूजा-अर्चना केल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक दुःखातून मुक्तता मिळते. मान्यता आहे की, भगवान सूर्याची पूजा केल्याने घरात यश, सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. परंतु भगवान सूर्यला अर्घ्य अर्पण करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे (Do Not Do These Mistakes While Offering Water To Sun). चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.
सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी स्नानानंतर तांब्याच्या भांड्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
सूर्याला जल अर्पण करण्यापूर्वी पाण्यात लाल फुले, कुंकू आणि तांदूळ टाकून जल अर्पण करावे.
सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्याच्या पडत्या प्रवाहासोबत सूर्याची किरणे पाहिली पाहिजेत.
पूर्वेकडे तोंड करूनच सूर्याला जल अर्पण करावे.
पाणी पायापर्यंत जाणार नाही याची काळजी घ्या.
जल अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करत राहावे.
सूर्याला जल अर्पण करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी.
पाणी अर्पण करताना बूट आणि चप्पल घालू नये. अनवाणी पायांनी सूर्याला जल अर्पण करा.
पाणी अर्पण करताना हे लक्षात ठेवा की पाणी तुमच्या पायात जाणार नाही.
या गोष्टींची काळजी न घेतल्यास अशुभ परिणाम मिळू शकतात.
ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमजोर आहे त्यांनी रोज सूर्याला जल अर्पण करावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सूर्याला जल अर्पण केल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते. सूर्याला जल अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे ठेवावे.
ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक असे वर्णन केले आहे. त्यामुळे आत्मशुद्धी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी सूर्याला नियमित प्रज्वलित करावे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
नामस्मरण म्हणजेच सर्वस्व असे सांगणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज