मुंबई, हींदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहाला आणि देवतेला समर्पित आहे. त्यानुसार रविवार (Sunday Upay) हा भगवान सूर्याचा दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्ती सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊ शकते. तसेच त्याची आयुष्यातील थांबलेली प्रगती मार्गी लागते. रविवारी भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जाऊ शकतात. यामुळे माता लक्ष्मीही प्रसन्न होते. जीवनात संपत्ती, प्रगती आणि ऐशोआराम मिळावा यासाठी सुर्यदेवाचा आशीर्वाद महत्वाचा मानला जाताे. जाणून घ्या रविवारी कोणते शुभ उपाय करावेत.
ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यांचे स्थान कमजोर आहे. त्यांच्यासाठी दान करणं खूपच शुभ मानलं जातं. यादिवसी एखाद्या गरजू व्यक्तींला गुळ, लाल कापड, गहू, लाल चंदन आणि तांब्याचे भाडं दान करा. त्याने तुमची रखडलेली कामं होतात. कुंडलीत सूर्याची जागा मजबूत होते. सूर्याला जल दान दररोज सूर्य देवाला नियमितपणे अर्ध्य दान करा. असं केल्याने सूर्य देव प्रसन्न होतात. तांब्याच्या कलशात पाणी भरून सूर्याला जल दान करा. तांब्यात लाल फुलं, लाल चंदन आणि साखर टाका. अर्ध्य दान करताना सूर्य देवाच्या मंत्राचा जप करा. तुम्ही ओम सूर्य देवाय नमो नम: मंत्राचा जप करू शकता. असं केल्याने कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत होते. जीवनात येणाऱ्या बाधा दूर होतात.
सूर्याला नियमीतपणे अर्ध्य दान दिलं पाहिजे. दररोज हे करणं शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी सूर्यांला अर्ध्य दान नक्की द्या. सूर्यांला अर्ध्य दान देताना. काही मंत्राचे जप करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही खाली दिलेल्या या मंत्रांचा जप करू शकता. ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य: ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नम: ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहणार्घय दिवाकर: ॐ ह्रीं घृणि: सूर्य आदित्य: क्लीं ॐ
रविवारच्या दिवशी पूजा-अर्चा करा. यादिवशी लाल चंदनाचा टिळा लावा. घरातील सर्व सदस्यांना लाल चंदनाचा टिळा लावा. त्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.
रविवारच्या दिवशी मस्यांना पिठाचे गोळे खायला द्या. त्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)