मुंबई : हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला सूरदास जयंती (Surdas Jayanti 2021) साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त सूरदास यांचा जन्म झाला होता. सूरदास हे त्यांच्या साहित्यिक कौशल्यांसाठी ओळखले जातात. ते त्यांच्या दोहे, कविता आणि रचनांसाठी प्रसिद्ध आहेत. आजही लोक त्यांच्या निर्मिती वाचून मंत्रमुग्ध होतात. आज, सूरदास जयंतीनिमित्त, त्याच्या जीवनाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया (Surdas Jayanti 2021 Know The Unknown Facts About Saint Surdas And His Devotion For Lord Krishna )
सूरदास यांचा जन्म 1478 इसवीसनमध्ये रुनकात गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामदास होते. सूरदासांच्या जन्मासंदर्भात वेगवेगळ्या मान्यता आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की ते जन्मापासूनच अंध होते. तर, काही लोक म्हणतात की ते अंध नव्हते.
सूरदास हे साधू वृत्तीचे व्यक्ती होते. त्यांना गाण्याची कला वरदान म्हणून मिळाली होती. ते लवकरच एक प्रसिद्ध साधू झाले. ते आग्राजवळील गौघाटात राहत होते. यादरम्यान त्यांची वल्लभचार्यजी यांच्याशी भेट झाली. त्यांनी सूरदासांना भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचे ज्ञान दिले आणि श्रीनाथजींच्या मंदिरात लीलागयानाचे काम सोपवले. सूरदास यांनी आयुष्यभर हे काम केले.
सूरदास हे भगवान श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. जेव्हा ते वल्लभाचार्य यांना भेटले, तेव्हा ते त्यांचे शिष्य झाले आणि पुष्टीमार्गाची दीक्षा घेतल्यानंतर ते श्रीकृष्णाचे भक्त झाले. त्यांच्या लीलांवर ते गाणी गायचे. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित दोहे आणि कविता त्यांनी लिहिल्या. प्रत्येकजण त्यांच्या या कलेने प्रभावित झाले. त्यांनी ब्रज भाषेतही बरंच काम केले आहे.
सूरदासांसंबंधी बऱ्याच कथा प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार, एकदा भगवान श्रीकृष्णाची भक्ती करताना सूरदास इतके मग्न झाले की ते विहिरीत पडले, त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचे प्राण वाचवले आणि त्यांची दृष्टी परत दिली. जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सूरदासांना काही वरदान मागण्यास सांगितले, तेव्हा ते म्हणाले की, कृपा करुन तुम्ही मला पुन्हा आंधळे करा. मला तुमच्याशिवाय या जगात दुसरे काहीही पाहायचे नाही. त्यामुळे सूरदास यांची गणना भगवान श्रीकृष्णांच्या श्रेष्ठ भक्तांमध्ये होते.
सतयुगातील कन्येचा द्वापारयुगातील श्रीकृष्णाचा भाऊ बलदाऊशी विवाह, जाणून घ्या ही पौराणिक कथाhttps://t.co/w7EOrBU3HW#ShreeKrishna #Balram
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2021
Surdas Jayanti 2021 Know The Unknown Facts About Saint Surdas And His Devotion For Lord Krishna
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?
Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा