मुंबई : सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची उपासना (Surya Upsana) केल्याने शुभ फळ मिळते. सूर्य एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठी भूमिका बजावतो. पत्रिकेत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते असे म्हटले जाते. पत्रिकेत सूर्याची स्थिती चांगली नसेल तर जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करावे. जर तुम्हाला रोज सूर्याला अर्घ्य देता येत नसेल तर रविवारी जरूर द्यावे. सूर्याला अर्घ्य दिल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान-सन्मान वाढतो. याशिवाय काही कारणास्तव लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्याने लवकर योग जुळून येतात. सूर्याला पाणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
सूर्याला सकाळी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळीच जल अर्पण करावे. तसेच सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. सूर्याला जल अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे. पाण्यात कुंकू किंवा लाल चंदन मिसळून सूर्याला जल अर्पण करा. याशिवाय या काळात तुम्ही सूर्यदेवाला लाल फुलेही अर्पण करू शकता.
असे म्हणतात की रोज सूर्याला जल अर्पण केल्याने शरीरात सूर्यदेवाचा प्रभावही वाढतो. यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढते. तसेच दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मशुद्धी आणि शक्ती प्राप्त होते. समाजात आदरही वाढतो.
रविवारी जल अर्पण करताना सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. असे म्हणतात की सूर्याच्या या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि समाजात मान-सन्मान मिळतो. सूर्य देवाचे मंत्र
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवंचित फलं देही देहि स्वाहा
ॐ आहि सुर्य सहस्त्रांषों तेजो राशे जगतपते, अनुकंपयेमा भक्त्या, ग्रहानर्घ्य दिवाकार:
ॐ हरीम घ्रिनिया सूर्य आदित्यह क्लीन ओम
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
ॐ सूर्याय नम:
ॐ घृणी सूर्याय नमः
ॐ भास्कराय नमः
ॐ अर्काय नमः
ॐ सावित्रे नमः
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)