Surya Upay : सूर्यदेवाच्या कृपेने होतो हितशत्रूपासून बचाव, रविवारी अवश्य करा हे उपाय

| Updated on: Aug 20, 2023 | 2:07 PM

सूर्यदेवाला हिरण्यगर्भ असेही म्हणतात. हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्या गर्भाला सुवर्ण आभा आहे. रविवारी सूर्यदेवाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे.

Surya Upay : सूर्यदेवाच्या कृपेने होतो हितशत्रूपासून बचाव, रविवारी अवश्य करा हे उपाय
सूर्यदेव
Follow us on

मुंबई : सूर्यदेवाला संपूर्ण ग्रहांचा राजा मानल्या जाते. पृथ्वीवरचा प्रत्त्येक घटक प्रकाशासाठी सूर्यावर निर्भर आहे. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. भगवान सूर्याचा दिवस (Surya Upay)असल्याने रविवारी सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्यदेवाला हिरण्यगर्भ असेही म्हणतात. हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्या गर्भाला सुवर्ण आभा आहे. रविवारी सूर्यदेवाची विधिवत पूजा करून जल अर्पण करावे.असे केल्याने सूर्यदेवाची कृपा निर्माण होऊन भक्तांना आयु, शक्ती, आरोग्य प्राप्त होते, व संकटांपासून मुक्ती मिळते. उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे हे प्रगतीचे सूचक मानले जाते. म्हणूनच सकाळी लवकर आंघोळ करून उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते.

चला जाणून घेऊया सूर्यदेवाची पूजा करण्याची पद्धत

1. सकाळी उठल्यावर स्नान आणि ध्यान केल्यानंतर तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात  कुंकू, लाल फुले टाकवी ओम घृनि सूर्याय नम: चा उच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे.

2.  दिवा लावून सूर्यदेवाचे ध्यान करा.

हे सुद्धा वाचा

3. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करताना सूर्याला नमस्कार करावा. सूर्यदेवाला जल अर्पण करा.

4. अर्घ्य देतांना आपली नजर भांड्यातील पाण्याच्या प्रवाहाकडे ठेवा. पाण्याच्या प्रवाहात सूर्याचे प्रतिबिंब पाण्याच्या प्रवाहात एका बिंदूच्या स्वरूपात दिसेल.

5. सूर्याला अर्घ्य अर्पण करताना दोन्ही हात इतके उंच करा की सूर्याचे प्रतिबिंब पाण्याच्या प्रवाहात दिसेल. रविवारी सूर्यदेवाची आरती करा, स्वःता भोवती सात प्रदक्षिणा मारा आणि हात जोडून नमस्कार करा.

6. सकाळी उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा येते.आपली दिनचर्या नियमित होते. व्यवसायात यश मिळते. हित शत्रूंच्या कारवाया त्यांच्यावरच उलटतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)