Swastik : हिंदू धर्मात स्वस्तिकला का आहे विशेष महत्त्व? या कारणामुळे दारावर काढले जाते स्वस्तिक

| Updated on: Jul 13, 2023 | 12:44 PM

हिंदू धर्मात अशी अनेक चिन्हे आहेत, जी शुभ मानली जातात. यापैकी एक स्वस्तिक आहे. स्वस्तिक म्हणजे शुभ. स्वस्तिकच्या चार ओळींची तुलना चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार जग आणि चार देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश (भगवान शिव) आणि गणेश यांच्याशी करण्यात आली आहे.

Swastik : हिंदू धर्मात स्वस्तिकला का आहे विशेष महत्त्व? या कारणामुळे दारावर काढले जाते स्वस्तिक
स्वस्तिक
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात स्वस्तिकचे (Swastik Benefits) चिन्ह अत्यंत शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करताना स्वस्तिक आवश्यक आहे. त्याशिवाय कुठल्याही  पूजेला सुरूवात होत नाही. स्वस्तिकचे चिन्ह शुभाचे सूचक मानले गेले आहे. अध्यात्मिक अनुभवाच्या आधारे, ऋषींनी शुभ प्रकट करण्यासाठी आणि जीवनात आनंद भरण्यासाठी चिन्हे निर्माण केली. यापैकी एक चिन्ह स्वस्तिकचे प्रतीक आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्वस्तिकचे चिन्ह भगवान विष्णूचे आसन आणि माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. चंदन, कुमकुम किंवा शेंदूरने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रह दोष दूर होतात. धनलाभाचे योग बनतात. घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते.

स्वस्तिक म्हणजे काय?

हिंदू धर्मात अशी अनेक चिन्हे आहेत, जी शुभ मानली जातात. यापैकी एक स्वस्तिक आहे. स्वस्तिक म्हणजे शुभ. स्वस्तिकचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही दिशेला केले तरी सकारात्मक ऊर्जा 100 पटीने वाढते. हिंदू धर्मावर विश्वास ठेवणारे बरेच लोकं घराच्या आत अनेक ठिकाणी घराच्या दारात बनवतात.

स्वस्तिकच्या चार भूजा चार देवतांचे प्रतीक

स्वस्तिकच्या चार ओळींची तुलना चार पुरुषार्थ, चार आश्रम, चार जग आणि चार देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश (भगवान शिव) आणि गणेश यांच्याशी करण्यात आली आहे. स्वस्तिकच्या चार ओळी जोडल्यानंतर मध्यभागी बनवलेला बिंदू वेगवेगळ्या समजुतींद्वारे परिभाषित केला जातो.

हे सुद्धा वाचा

स्वस्तिकचे वैज्ञानिक महत्त्व

  •  जर तुम्ही स्वस्तिक योग्य प्रकारे बनवले असेल तर त्यातून खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा वस्तू किंवा व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरते.
  •  स्वस्तिकच्या ऊर्जेचा वापर घरात, दवाखान्यात किंवा दैनंदिन जीवनात केला तर व्यक्ती रोगमुक्त आणि चिंतामुक्त राहू शकते.
  • चुकीच्या पद्धतीने वापरलेले स्वस्तिक गंभीर समस्या निर्माण करू शकते.

स्वस्तिक कसे असावे

  •  स्वस्तिकच्या रेषा आणि कोन परिपूर्ण असावेत.
  • चुकूनही उलटे स्वस्तिक बनवू नका आणि वापरू नका.
  • लाल आणि पिवळ्या रंगाचे स्वस्तिक सर्वोत्तम आहेत.
  •  जिथे वास्तुदोष असेल तिथे घराच्या मुख्य दरवाजावर लाल रंगाचे स्वस्तिक लावावे.
  • पूजेच्या ठिकाणी, अभ्यासाच्या ठिकाणी आणि वाहनात आपल्यासमोर स्वस्तिक बनवल्याने फायदा होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)