नवी दिल्ली, गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पवित्र केदारनाथ मंदिराच्या (Kedarnath Dham) आसपासच्या डोंगरावर हिमस्खलन (Avalanche) झाले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) मंदिराच्या मागे असलेल्या टेकड्यांवरून बर्फ वेगाने खाली येत असल्याचे दिसत आहे. हिमस्खलनाचा धोका असलेला भाग चोरबारी ग्लेशियर पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हे ठिकाण केदारनाथ मंदिर परिसरापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. या हिमस्खलनात जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. संबंधित अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. केदारनाथ खोऱ्यातील हवामान गेल्या काही दिवसांपासून खूपच खराब आहे आणि तेथे मुसळधार पाऊस पडत आहे.
Subscribe?TELEGRAM: https://t.co/Uw6hADCvaz
An avalanche in Kedarnath is a village in the Himalayas, in the Rudraprayag district of the Indian state of Uttarakhand. India#Kedarnath #Avalanche pic.twitter.com/5Vegf5fVMA— BRAVE SPIRIT (@Brave_spirit81) September 23, 2022
धक्कादायक बाब म्हणजे हे हिमालयातील तेच हिमनदीचे सरोवर जिथे 2013 मध्ये प्रलयकारी ढगफुटी झाली होती, ज्यामुळे उत्तराखंडमध्ये सर्वात विनाशकारी पूर आला होता. जून 2013 मध्ये, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे चोरबारी ग्लेशियर वितळले आणि मंदाकिनी नदीतील पाण्याची पातळी धोकादायक स्थरावर पोहोचली होती. या भीषण पुरामुळे उत्तराखंडचा मोठा भाग प्रभावित झाला. केदारनाथ खोऱ्यात सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. या हृदयद्रावक नैसर्गिक आपत्तीत 5,000 हून अधिक लोक मरण पावले. केदारनाथ मंदिर परिसराचे मोठे नुकसान झाले असले तरी मुख्य मंदिराचे कुठलेच नुकसान झाले नाही हे विशेष.
असे सांगण्यात येते की, एक महाकाय दगड घसरून मंदिराच्या मागे उभा राहिला होता, त्यामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आणि मंदिराचे नुकसान होण्यापासून वाचले. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या देखरेखीखाली केदारनाथ धाम पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली. ज्या अंतर्गत संपूर्ण मंदिर परिसराचे पुनर्वसन करण्यात आले. धाममध्ये भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विकासासंबंधी सर्व प्रकारची कामे झाली. आजूबाजूच्या नद्यांच्या काठावर पक्के घाट बांधले गेले. हेलिपॅड, रुग्णालये, प्रवाशांसाठी लॉज, पुरोहितांसाठी निवास्थानं बांधण्यात आले. आदिशंकराचार्य स्मारक बांधले. सध्या मंदिराच्या गाभाऱ्यात सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम सुरू आहे.