साल 2024 चे पहिले सुर्यग्रहण 8 एप्रिल रोजी लागले होते. आता या वर्षीचे दुसरे सुर्यग्रहण येत्या ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे. चंद्रग्रहण तसेच सुर्यग्रहणाला धार्मिक महत्व असले तरी या खगोलीय घटनेकडे अवकाशप्रेमी आणि खगोल अभ्यासक एक खगोलीय घटना म्हणून पाहातात. त्यामुळे खगोल वैज्ञानिकता मोठा उत्साह पसरला आहे. हिंदू धर्मशास्रानूसार ग्रहणाच्या काळाला महत्वाचे काळ मानले गेले आहे. हिंदू धर्मात ग्रहणकाळाला अशूभ मानले जाते. तर फलज्योतीष शास्रानूसार ग्रहणाचा प्रभाव देश आणि जगासह सर्व राशींवर होत असतो. चंद्र जेव्हा सुर्याला अंशत: किंवा संपूर्णपणे झाकतो तेव्हा सुर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचू शकत नाही किंवा कमी पोहचतो. खंग्रास सुर्यग्रहणाच्या वेळी संपूर्ण अंधार पसरतो आणि पक्षी देखील आपल्या घरट्यांकडे परतू लागतात. कधी दिवसा आकाशात तारे दिसू लागतात. तर कधी कधी थंडी देखील वाजू लागते. यास सूर्यग्रहण असे म्हटले जात आहे.
वर्षाचे दुसरे सुर्यग्रहण बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंचांगाप्रमाणे या दिवशी भाद्रपद अमावस्या म्हणजेच सर्वपित्री दर्श अमावस्या असणार आहे. याच दिवशी पितृ पक्ष म्हणजे पित्रांना नैवेद्य दाखविण्याचा शेवटचा दिवस असेल. 2ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण रात्री 09:13 सुरु होईल आणि 03:17 वाजेपर्यंत असणार आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तासांचा असणार आहे.
हे सुर्यग्रहण कंकणाकृती असणार आहे. भारतीय वेळेप्रमाणे ते रात्री सुरु होणार आहे. त्यामुळे भारतातून ते दिसणार नाही. भारतातून सूर्यग्रहण दिसणार नसल्याने ग्रहणाचा सुतक काळ देखील पाळण्याची गरज नाही. आणि पूजाविधी सारखे धार्मिक विधी देखील कोणतेही बंधन नसणार आहे.
2 ऑक्टोबर रोजी लागणारे सुर्यग्रहण अद्वितीय असणार आहे. या दरम्यान सुर्याचे कंकणाकृती रुप दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती असल्याने सुर्याभोवती रिंग असणार आहे. ज्यावेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा अवकाशात चंद्र सुर्याला झाकतो. परंतू जेव्हा चंद्र आपल्या कक्षेत सर्वात दूरच्या स्थानी असतो तेव्हा तो छोटा दिसत असतो. अशा वेळी सुर्याला संपूर्ण झाकण्याऐवजी सुर्याच्या मधल्या भागाला चंद्र झाकतो. त्यामुळे चंद्राभोवती कंकणाकृती तयार होते. त्यालाचा कंकणा कृती दिसते.या वेळी अवकाशात सुर्याचा प्रकाश एका रिंग सारखा दिसतो. यास शास्रज्ञ (Ring of Fire) ‘रिंग ऑफ फायर’ चा नजारा म्हणतात.