March Surya Grahan 2025: यंदाच्या साल २०२५ मध्ये चार खगोलीय घटना घडणार आहेत. ज्यात दोन सुर्यग्रहण तर दोन चंद्र ग्रहण असणार आहेत. वर्षाचे पहिले सुर्यग्रहण एक खंडग्रास असणार आहे. हे सुर्यग्रहण पुढील महिन्यात मार्चमध्ये लागणार आहे. वर्षाचे पहिले सुर्यग्रहण २९ मार्चला होणार आहे. हे सुर्यग्रहण खंडग्रास म्हणजे अंशत:असणार आहे. चंद्र सुर्याच्या एका भागाला झाकणार आहे. त्यामुळे सुर्याचा अर्धा भागच दिसणार आहे तर अर्धा भाग चंद्रामुळे दिसणार नाही. परंतू हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.
पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण लागतं. चंद्रामुळे सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग अडवला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. याला सूर्य ग्रहण असे म्हणतात.चंद्र किती टक्के सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाला खग्रास, खंडग्रास वा कंकणाकृती असे प्रकार पडतात. हे सुर्यग्रहण खंडग्रास आहे.हे सुर्यग्रहण यूरोप, आशिया, आफ्रीका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्टीक्ट महासागराच्या काही भागातून दिसणार आहे.
यंदाच्या साल २०२५ मध्ये दोन सुर्यग्रहण लागणार आहेत. यातील पहिले सुर्यग्रहण २९ मार्च रोजी तर दुसरे सुर्यग्रहण २१-२२ सप्टेंबरला होणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाचा कालावधी अशुभ मानला जात असतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
भारतीय वेळनूसार, हे पहिले सूर्य ग्रहण दुपारी २.२१ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.१४ वाजेपर्यंत असणार आहे. हे सुर्यग्रहण खंडग्रास असून सुर्य अर्धवटच झाकला जाईल. मीन राशी आणि उत्तर भाद्रपद नक्षत्रात हे ग्रहण लागणार आहे.
सूर्यग्रहण केवळ अमावस्येलाच होते
सूर्यग्रहणाचे तीन प्रकार असतात
खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती असे तीन प्रकार
कंकणाकृती सुर्यग्रहणास ‘रिंग ऑफ फायर’ असेही म्हणतात
खंग्रास ग्रहणावेळी सुर्य बिंब पूर्ण झाकल्याने दिवसा रात्रीसारखे वातावरण होते
खंग्रास सुर्यग्रहण केवळ सात मिनटांपर्यंत रहाते