अधिकमासातला तीसरा सोमवार आहे अत्यंत खास, नोकरीत प्रगतीसाठी अवश्य करा हे उपाय

| Updated on: Aug 06, 2023 | 4:13 PM

अधिक (Adhik Mass 2023) श्रावण असल्याने भगवान शंकराची पूजा करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे या महिन्यातील सोमवारचे महत्त्व अधिकच वाढते.

अधिकमासातला तीसरा सोमवार आहे अत्यंत खास, नोकरीत प्रगतीसाठी अवश्य करा हे उपाय
अधिक मास
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू झाला आहे, दर तीन वर्षातून एकदा हा महिना येत असल्याने तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच हा अधिक (Adhik Mass 2023) श्रावण असल्याने भगवान शंकराची पूजा करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळे या महिन्यातील सोमवारचे महत्त्व अधिकच वाढते. असे मानले जाते की या विशेष दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने साधकाला सुख-समृद्धी प्राप्त होते. श्रावण सोमवारी भगवान शंकराचा जलाभिषेक केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

चंद्र दोषापासून मिळेल मुक्ती

पत्रिकेतील चंद्र दोषामुळे व्यक्तीचे मन चंचल राहते. त्यामुळे घरात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या दोषामुळे कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागतो आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण  महिन्याच्या पाचव्या सोमवारी चंद्र स्तोत्राचे पठण करा.

यामुळे पत्रिकेतील चंद्र ग्रह बलवान होतो. चंद्राची शुभ प्राप्ती होण्यासाठी या दिवशी रामायणातील अयोध्या कांडाचे पठण करणे देखील शुभ आहे, यामुळे नोकरीत बढती मिळण्याची शक्यता वाढते.

हे सुद्धा वाचा

करिअरमध्ये मिळेल यश

जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर तुम्ही श्रावणाच्या पाचव्या सोमवारी भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करू शकता. हा उपाय केल्याने व्यक्तीला करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते.

घरामध्ये संकट आले असेल, कुटुंबातील सुख-शांतीला एखाद्याला दृष्ट लागली असेल, तर अधिकमासात एखाद्या मंदिरात ध्वज दान करा. दिवेही दान करावे. यामुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक वेदना दूर होतात. अधिकामात सवाष्णासाठी साहित्य, तांदूळ, पैसा, कपडे दान करा. यामुळे कधीही न संपणारे पुण्य मिळते. दुःख आणि गरिबीपासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)